नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी ( congress leader rahul gandhi ) यांनी बुधवारी महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा ( rahul gandhi tweet ) साधला. या विषयांवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासाठी 'राजा'ने 57 खासदारांना अटक केली आणि 23 खासदारांना निलंबित केल्याचा आरोप त्यांनी केला. ( congress protest against inflation unemployment )
त्यांनी ट्विट केले की, "सिलेंडर 1053 रुपये का? दही-धान्यावर जीएसटी का? मोहरीचे तेल 200 रुपये का? महागाई आणि बेरोजगारीवर प्रश्न विचारल्याबद्दल 'राजा'ने 57 खासदारांना अटक आणि 23 खासदारांना निलंबित केले," असे ट्विट त्यांनी केले.