प्रयागराज ( उत्तर प्रदेश )- मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Raj Thackeray Ayodhya Visit ) 5 जून रोजी अयोध्येला जाणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत मनसेच शेकडो कार्यकर्तेही आणि पदाधिकारीही अयोध्येला जाणार आहेत. मनसेच्या उत्तर प्रदेश दौऱ्याची संपूर्ण माहिती पक्षाचे सरचिटणीस डॉ. वगीश सारस्वत यांनी दिली आहे.
योगी आदित्यनाथ यांना भेटण्याची शक्यता -महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे ५ जूनला रामाची पूजा करण्यासाठी अयोध्येत पोहोचणार आहेत. हजारो कार्यकर्ते त्यांच्या पक्षाचे नेतेही उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या यूपी दौऱ्यादरम्यान ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत पक्षाकडून अद्याप कोणतीही ठोस माहिती देण्यात आलेली नाही.