महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Raj Kundra Pornography Case : सर्वोच्च न्यायालयाकडून राज कुंद्राला दिलासा; 4 आठवड्यांसाठी अटकेपासून संरक्षण - राज कुंद्राला अटकेपासून संरक्षण

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court on Raj Kundra Pornography Case) राज कुंद्राला चार आठवड्यांसाठी अटकेपासून अंतरिम संरक्षण (Raj Kundra Gets Interim Relief From Arrest ) दिले आहे. यासोबतच न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे.

Raj Kundra pornography case
राज कुंद्रा

By

Published : Dec 15, 2021, 12:24 PM IST

Updated : Dec 15, 2021, 3:05 PM IST

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाकडून पॉर्नोग्राफी प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा ( Actress Shilpa Shetty ) पती राज कुंद्राला मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court on Raj Kundra Pornography Case) राज कुंद्राला चार आठवड्यांसाठी अटकेपासून अंतरिम संरक्षण (Raj Kundra Gets Relief From Arrest ) दिले आहे. यासोबतच न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे.

नोव्हेंबरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने पॉर्नोग्राफी व्हिडिओ प्रकरणात अडकलेल्या राज कुंद्राचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्याविरोधात कुंद्राने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाने कुंद्रासह अन्य सहा जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. यामध्ये शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांच्या नावाचा समावेश आहे. या प्रकरणात उमेश कामत, सुवोजित चौधरी आणि सॅम अहमद हे तिघेही आरोपी आहेत. राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 19 जुलैच्या रात्री अटक केली होती. ‘हॉटशॉट्स’ या अॅपवरून पॉर्नोग्राफीक चित्रपट वितरित केल्याचा आरोप राज कुंद्रा याच्यावर आहे. याप्रकरणी त्याची सप्टेंबर महिन्यात जामिनावर सुटका करण्यात आली. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे.


पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकलेल्या कुंद्राने आपल्याला बळीचा बकरा बनवण्यात येत असल्याचा दावा केला होता. त्याचवेळी त्याच्या अटकेनंतर शिल्पाच्या अडचणीही वाढल्या होत्या. यादरम्यान तिने स्वतःला घरात कोंडून घेतले होते आणि ती कोणाला भेटायला तयार नव्हती. मात्र, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसही त्यांच्या घरी पोहोचले होते. कुंद्रा यांच्यावर अश्लील मजकूर तयार करून तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर अपलोड केल्याचा गंभीर आरोप होता. पतीला जामीन मिळाल्यानंतर शिल्पाने सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा -शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा यांचा अभिनेत्री शर्लिन चोप्रा विरुद्ध 50 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

Last Updated : Dec 15, 2021, 3:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details