चेन्नई -सध्या देशभरात थंडीला सुरुवात झाली (Tamilnadu Rain) आहे. मात्र, तामिळनाडू आणि केरळमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळे तामिळनाडमध्ये तिघांचा मृत्यू झाला (Kerala Rain) आहे. आतापर्यंत 26 जणांना पावसामुळे प्राण गमवावे लागले आहेत. याबाबतची माहिती आज राज्य सरकराने दिली आहे. यावर्षी पाऊस देशबरात उशीरापर्यंत बरसत होता. दिवाळी झाल्यानंतरही तामिळनाडू आणि केरळात पाऊस सुरूच आहे.
Rain News : तामिळनाडू, केरळात जोरदार पाऊस; आतापर्यंत एकूण 26 जणांचा मृत्यू - केरळात जोरदार पाऊस
थंडीला सुरुवात झाली (Tamilnadu Rain) आहे. मात्र, तामिळनाडू आणि केरळमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळे तामिळनाडमध्ये तिघांचा मृत्यू झाला (Kerala Rain) आहे. आतापर्यंत 26 जणांना पावसामुळे प्राण गमवावे लागले आहेत. याबाबतची माहिती आज राज्य सरकराने दिली आहे.
तामिळनाडू, केरळात पाऊस - चेन्नईमध्ये पावसामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. तर तिकडे केरळमध्ये देखील जोरदार पावसाची बॅटिंग सुरू आहे. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत देण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे. तर तिरुवल्लूर जिल्ह्यात पावसामुळे एकाचा मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. ईशान्य मान्सूनची सुरुवात २९ ऑक्टोबरला झाली. तामिळनाडूमध्ये गेल्या 24 तासांत 10.04 मिमी पाऊस झाला आहे. नागापट्टिनम जिल्ह्यातील कोडियाकराई स्टेशनमध्ये सर्वाधिक 9 सेमी पाऊस झाला, तर रामेश्वरम (रामनाथपुरम) येथे अनुक्रमे 8, कोट्टाराम (कन्याकुमारी) आणि कुलशेखरपट्टिनम (थुथुकुडी) येथे प्रत्येकी 7 सेमी पाऊस झाला.
मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत - शुक्रवारच्या पावसात सुमारे 25 गुरे मरण पावली आणि 140 झोपड्यांचे नुकसान झाल्याचे सरकारने सांगितले. चेन्नईमध्ये 4 नोव्हेंबर रोजी उन्मळून पडलेली सुमारे 64 झाडे हटवण्यात आली. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी पीडित कुटुंबांना मुख्यमंत्री सार्वजनिक मदत निधीतून प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्याचे मंत्री के.एन.नेहरू आणि पीके शेखर बाबू यांनी स्वतः मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली, त्यांचे सांत्वन केले आणि जाहीर केल्याप्रमाणे मदत दिली.