महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Vande Bharat Train News : जम्मू काश्मीरला पुढील वर्षी मिळणार वंदे भारत रेल्वे - रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव - बनिहाल ते बारामुल्लापर्यंत चार कार्गो टर्मिनल

केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी काश्मीरच्या बारामुल्ला रेल्वे स्थानकावरील सुविधांचा आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले की, नजीकच्या काळात काश्मीरची रेल्वे सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जम्मू आणि काश्मीरमधील अंजी नदीवरील भारतातील पहिला केबल स्टेड रेल्वे पूल या वर्षी मेपर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे. बनिहाल ते बारामुल्लापर्यंत चार कार्गो टर्मिनल बांधण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Mar 26, 2023, 9:11 AM IST

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

बडगाम : केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव सध्या जम्मू - काश्मीरच्या दौऱ्यावर आले आहेत. काल त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसह बडगाम स्टेशन ते बारामुल्ला असा रेल्वे प्रवास केला. यानंतर अश्विनी वैष्णव म्हणाले की, त्यांनी श्रीनगर ते बारामुल्ला रेल्वे मार्गाची पाहणी केली. बारामुल्ला येथील स्थानिक लोकांचीही भेट घेतली. बारामुल्ला रेल्वे स्थानकावर प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला.

काश्मीर रेल्वेने जोडला जाईल : माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, भारतीय रेल्वेची शेवटची लाईन असलेल्या बारामुल्लाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. याचा मला खूप आनंद झाला आहे आणि भारतीय रेल्वेचे नेटवर्क अधिक चांगले करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अश्विनी वैष्णव यांनी बडगाममध्ये पीआरआय जिल्हा विकास परिषदेचे सदस्य, पंच आणि सरपंच यांचीही भेट घेतली. तसेच नजीकच्या भविष्यात काश्मीरची रेल्वे सुधारण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. डिसेंबर 2023 किंवा जानेवारी 2024 पर्यंत हा प्रदेश देशाच्या इतर भागांशी रेल्वेने जोडला जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.

खास वंदे भारत गाड्याही धावतील : अश्विनी वैष्णव पुढे म्हणाले की, या मार्गावर खास वंदे भारत गाड्याही धावतील. काश्मीरचे हवामान लक्षात घेऊन या गाड्या तयार केल्या जात आहेत. ही ट्रेन इतर ट्रॅकवरही धावणार असल्याने ट्रेन बदलण्याची गरज नाही. यंदाच्या रेल्वेच्या अर्थसंकल्पातील तरतूदीबाबत केंद्रीय मंत्री म्हणाले की, 5983 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात जम्मू - काश्मीरमधील रेल्वे प्रकल्पांसाठी सर्वाधिक तरतूद करण्यात आली आहे.

रेल्वे सुविधांमध्ये सुधारणा करणार : जम्मू आणि चिनाब व्हॅली रेल्वे मार्गाबाबत मंत्री म्हणाले की, काश्मीरला देशाशी जोडण्यासाठी रेल्वेने मोठे पूल आणि बोगद्यांचे काम जवळपास पूर्ण केले आहे. आता लवकरच काश्मीर देशाच्या रेल्वेशी जोडले जाईल. ते म्हणाले की, आज ते चिनाबमधील सर्वात उंच रेल्वे पुलाच्या प्रगतीची पाहणी करणार आहेत. ते म्हणाले की, रेल्वे बनिहाल ते बारामुल्ला रेल्वे विभागापर्यंत चार कार्गो टर्मिनल उभारणार आहे, जेणेकरून येथे मालाची वाहतूक करता येईल. तसेच येथील खास माल कमी किमतीत देशातील इतर राज्यांमध्ये पोहोचवला जाईल. स्टेशनमध्ये सुधारणा, दुहेरी लाईन, टेलिफोन कनेक्टिव्हिटी, पार्सल सेवा, हीटिंग सिस्टम आदी सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येणार असल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी सांगितले.

भारतातील पहिला केबल स्टेड रेल्वे पूल : रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, जम्मू - काश्मीरमधील अंजी नदीवरील भारतातील पहिला केबल स्टेड रेल्वे पूल लवकरच तयार होण्याची अपेक्षा आहे. ते म्हणाले की, जम्मूपासून सुमारे 80 किमी अंतरावर बांधल्या जात असलेल्या या पुलावर तयार झाल्यानंतर गाड्या ताशी 100 किमी वेगाने धावतील. कटरा आणि रियासी स्थानकांदरम्यान बांधण्यात येत असलेला अंजी पूल जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील रियासी जिल्ह्यात येतो. केबल स्टेड रेल्वे ब्रिज हा महत्त्वाकांक्षी उधमपूर - श्रीनगर - बारामुल्ला रेल लिंक (USBRL) प्रकल्पाचा एक भाग आहे, ज्याचे बांधकाम पुढील वर्षी पूर्ण करण्याची घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली होती.

हेही वाचा :Manish Sisodia Bail Plea : ईडीकडून उत्तर नाही... मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर ५ एप्रिलला सुनावणी

ABOUT THE AUTHOR

...view details