नवी दिल्ली :सणासुदीच्या काळात प्रवाशांचा सुरळीत आणि आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने मंगळवारी विशेष सेवांच्या 179 जोड्यांना अधिसूचित केले आहेत. मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि या सणासुदीच्या काळात प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी, भारतीय रेल्वे यावर्षी छठ पूजेपर्यंत 179 विशेष गाड्यांच्या 2,269 फेऱ्या जोडीने चालवणार आहे. ( special trains will be run till Chhath Puja )
Railway News : सणासुदीला रेल्वेचे गिफ्ट; 179 विशेष गाड्या छठ पूजेपर्यंत सुरू राहणार
सणासुदीच्या काळात प्रवाशांचा सुरळीत आणि आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने छठ पूजेपर्यंत 179 जोड्या विशेष गाड्या सोडल्या आहेत. ( special trains will be run till Chhath Puja )
: सणासुदीला रेल्वेचे गिफ्ट
या गाड्या दिल्ली-पाटणा, दिल्ली-भागलपूर, दिल्ली-मुझफ्फरपूर, दिल्ली-सहरसा इत्यादी रेल्वे मार्गांवर चालवण्याचा रेल्वेचा विचार आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अनारक्षित डब्यांमध्ये प्रवाशांच्या प्रवेशासाठी आरपीएफ कर्मचार्यांच्या देखरेखीखाली स्थानकांवर गर्दी नियंत्रण केले जात आहे.
Last Updated : Oct 7, 2022, 8:18 AM IST