नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठी वाहतूक सेवा देणाऱ्या रेल्वेबाबत महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे मंत्रालयाने रेल्वे ही खासगी कंपन्यांना चालविण्याला देण्यासाठी आजपासून अर्ज मागविले आहेत. ही माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी दिली.
केंद्रीय रेल मंत्री अश्विनी वैष्णव (Union Railway Minister Ashwini Vaishnav) म्हणाले, की भारत गौरव रेल्वेचा उद्देश हा पर्यटनाला प्रोत्साहन देणे आहे. भारत गौरव रेल्वेसाठी 180 हून अधिक रेल्वे (Allocation of more than 180 trains) राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर 3033 रेल्वे डबे (3033 Identity of Coaches) राखीव आहेत. आहेत.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव ( Railway Minister Ashwini Vaishnav) म्हणाले, की आपल्याला डिझाईनिंग, जेवण, पोषाख आणि अन्य गोष्टींच्या प्रक्रियेबाबत सजग राहण्याची गरज आहे.
हेही वाचा-Taj Mahal : बुरहानपूरच्या 'शाहजहा'ने पत्नीला भेट दिला 'ताज महल'
सांस्कृतिक वारसा आणि रेल्वे एकत्रित यावे हे पंतप्रधानांचे व्हिजन