कन्याकुमारी (तमीळनाडु) - काँग्रेस नेत्यांनी 'भारत जोडो यात्रे'च्या चौथ्या दिवशी कन्याकुमारी येथील मुलागुमुडू येथून पुढचा प्रवास सुरू केला. आज संध्याकाळपर्यंत केरळमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्यासह पक्षाच्या इतर नेत्यांनी भारताच्या अखंडतेसाठी हा प्रवास सुरू केला आहे. तत्पूर्वी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, 'भारत जोडो यात्रा' हा भाजप आणि आरएसएसने केलेले नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न आहे. आमच्यासाठी ही यात्रा लोकांशी जोडण्यासाठी आहे. भाजपच्या विचारसरणीमुळे या देशाचे जे नुकसान झाले आहे, त्याविरोधात आम्ही ही यात्रा काढली आहे," असे ते म्हणाले. "भाजपने देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवून त्यांच्यावर दबाव आणला आहे. आम्ही आता राजकीय पक्ष म्हणून लढत नाही. तर, एक विचार म्हणून लढत आहोत.
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही भाऊ राहुल गांधी यांच्या खांद्याला खांदा लावून भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. प्रियांका गांधी यांनी 19 ते 22 सप्टेंबर दरम्यान केरळमधील भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. (Priyanka Gandhi will participate Bharat Jodo yatra ) काँग्रेसची भारत जोडो यात्रा ७ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे.