नवी दिल्ली - काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची गेल्या तीन दिवसांपासून ईडी चौकशी सुरू आहे. दरम्यान, त्यांनी ही चौकशी तीन दिवसांनी पुढे ढकलण्याची पत्राद्वारे मागणी केली होती. ( Rahul Gandhi Demand To ED To Postpone Inquiry ) त्यावर ईडीकडून राहुल गांधीची मुदतीचा अर्ज स्वीकारला आहे. आता त्यांची सोमवारी (20 जून) चौकशी होणार आहे.
काँग्रेस अध्यक्ष सोनीया गांधी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आजारी आहेत. सध्या त्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल आहेत. बुधवारी ईडीची चौकशी संपल्यानंतर राहुल गांधी त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते. ( Sonia Gandhi Health ) त्यांनी आपल्या आई सोनीया यांची विचारपूस केली. दरम्यान, ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनीया गांधी यांनाही 23 जूनला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. परंतु, त्यांची तब्येत ठीक नसल्याने त्या हजर राहतील की नाही याबद्दल तुर्तास काही ठोस माहिती उपलब्ध नाही.
बुधवारी निदर्शनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप अनावर झाला. त्यामध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागले. ज्यामध्ये अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. तर, यामध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह कार्यकर्त्यांचीही पोलिसांकडून धर-पकड करण्यात आली आहे. राहुल यांच्या माध्यमातून काँग्रेसने भाजपवर आरोप केला होता की, राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या धोरणांवर टीका करतता त्यामुळे त्यांना लक्ष्य केले जात आहे असा थेट आरोप करण्यात आला आहे.
सध्या राहुल गांधी हे गंगाराम रुग्णालयात असून, सोनीया गांधी यांच्या तब्येतीकडे लक्ष देण्यासाठी ते रुग्णलयात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांका गांधीही सोनीया गांधी यांच्यासोबत आहेत. सोनिया गांधी यांची 2 जून रोजी करोना चाचणी सकारात्मक आली होती. त्यानंतर त्यांना दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा -राहुल गांधींची 'ED'चौकशी प्रकरण! देशभर काँग्रेसचे निदर्शने; लोकसभा अध्यक्षांकडेही तक्रार