महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी दिवंगत सिद्धू मूसेवाला यांच्या कुटुंबाचे केले सांत्वन

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज मंगळवार (दि. 7 जुन)रोजी पंजाबध्ये जाऊन दिवंगत सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांचे सांत्वन केले. मंगळवारी सकाळी चंदीगड विमानतळावर उतरल्यानंतर राहुल गांधी थेट मूसेवाला यांच्या मूळ गावी मुसा येथे पोहचले. त्यांनी सिद्धु मुसेवाला यांच्या कुटुंबासोबत सुमारे 50 मिनिटे वेळ व्यथित केला. तसेच, मुसेवाला यांना पुष्पचक्र अर्पण करून त्यांनी श्रद्धांजली वाहिली.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिवंगत सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबाची भेट घेतली
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिवंगत सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबाची भेट घेतली

By

Published : Jun 7, 2022, 8:15 PM IST

मानसा - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की, मंगळवारी सकाळी चंदीगड विमानतळावर उतरल्यानंतर राहुल थेट मूसेवाला यांच्या मूळ गावी मुसा येथे गेले आणि त्यांनी कुटुंबासोबत सुमारे 50 मिनिटे घालवली. त्यांनी मुसेवाला यांना पुष्पचक्र अर्पण केले.

पंजाब काँग्रेसचे प्रमुख अमरिंदर सिंग राजा वारिंग, पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते प्रताप सिंग बाजवा आणि माजी उपमुख्यमंत्री ओपी सोनी यांच्यासह अनेक काँग्रेस नेतेही राहुल यांच्यासोबत मूसेवाला यांच्या गावात गेले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुसेवाला यांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. मुसेवाला यांची 29 मे रोजी मानसा येथे अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. ही घटना घडली तेव्हा राहुल परदेशात होते. ते गेल्या आठवड्यात मायदेशी परतले आहेत.

राहुल गांधी यांनी दिवंगत सिद्धू मूसेवाला यांच्या कुटुंबाचे केले सांत्वन

मुसेवाला यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. (2022) च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत त्यांनी मानसा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर नशीब आजमावले होते. परंतु, ते निवडणूक जिंकू शकले नाहीत. विविध पक्षांचे नेते आणि प्रमुख व्यक्ती मूसेवाला यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आणि त्यांचे सांत्वन करण्यासाठी मुसा गावाला भेट देत आहेत.

राहुल गांधी यांनी दिवंगत सिद्धू मूसेवाला यांच्या कुटुंबाचे केले सांत्वन

राहुल यांच्या आगमनाच्या काही वेळापूर्वी, पटियालाच्या काँग्रेस खासदार प्रनीत कौर यांनीही मुसेवाला यांच्या घरी जाऊन त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. प्रनीत कौर या पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही मुसेवाला यांच्या पालकांची भेट घेतली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रताप सिंग बाजवा यांनी मुख्यमंत्री मान यांना पत्र लिहून मुसेवाला हत्येचा तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) किंवा राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA)कडे हस्तांतरित करण्याची विनंती केली आहे.

राहुल गांधी यांनी दिवंगत सिद्धू मूसेवाला यांच्या कुटुंबाचे केले सांत्वन

पंजाब पोलिसांनी ज्यांची सुरक्षा तात्पुरती काढून टाकली किंवा कमी केली अशा ४२४ लोकांमध्ये मुसेवाला यांचा समावेश होता. पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसेवाला यांच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात होता. टोळीचा सदस्य आणि कॅनडास्थित गोल्डी ब्रार याने हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.

हेही वाचा -Pradeep Bhide Passed Away : भारदस्त आवाज हरपला! वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे निधन

ABOUT THE AUTHOR

...view details