इंफाळ : काँग्रेस नेते राहुल गांधी आजपासून दोन दिवसांच्या हिंसाचारग्रस्त मणिपूर दौऱ्यावर गेले आहेत. यादरम्यान राहुल गांधी हे जातीय हिंसाचारामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांना मदत शिबिरांमध्ये भेटून संवाद साधणार होते. मणिपूरमध्ये 3 मे रोजी हिंसाचार सुरू झाल्यानंतर राहुल गांधी यांचा हा मणिपूर राज्याचा पहिला दौरा आहे. इंफाळला पोहोचल्यानंतर राहुल गांधी चुरचंदपूरला जाणार होते. तेथे राहुल गांधी हे मदत शिबिरांना भेट देऊन विष्णुपूर जिल्ह्यातील मोइरांग येथे जाऊन विस्थापित नागरिकांशी संवाद साधणार असल्याची माहिती काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने बुधवारी दिली होती. मात्र राहुल गांधी यांचा ताफा पोलिसांनी विष्णूपूरला अडवला आहे. त्यामुळे राहुल गांधी हे इंफाळला परतले आहेत.
मे महिन्यात सुरू झाला जातीय संघर्ष :मणिपूर येथे मे महिन्यात जातीय संघर्ष सुरू झाला आहे. हा जातीय संघर्ष सुरू झाल्यापासून आतापर्यंत 50 हजारापेक्षाही जास्त नागरिक बेघर झाले आहेत. हे नागरिक 300 मदत छावण्यांमध्ये राहत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी या नागरिकांना मदत छावण्यात जाऊन भेट देणार होते. त्यानंतर काही संघटनांसोबतही राहुल गांधी हे संवाद साधणार होते. मात्अर राहुल गांधी हे विष्णूपूरला पोहोचल्यानंतर पोलिसांनी त्यांचा ताफा अडवला आहे. त्यामुळे राहुल गांधी हे इंफाळला पोहोचले आहेत.
मणिपूर हिंसाचारात आतापर्यंत 100 नागरिकांचा मृत्यू :मणिपूर राज्यात जातीय हिंसाचार सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी नागरिकांवर हल्ले करण्यात आले आहेत. मणिपूरमधील जातीय हल्ल्यात आतापर्यंत 100 मेईतेई समाजातील नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मणिपूरमध्ये मेईतेई समुदायाला अनुसूचित जमाती (एसटी) दर्जाच्या मागणीच्या निषेधार्थ 3 मे रोजी पहाडी जिल्ह्यांमध्ये आदिवासी एकता मोर्चा काढण्यात आल्यानंतर हिंसाचार सुरु झाला होता.