नवी दिल्ली - दिल्लीच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीत केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला असून अद्याप त्यावर काही तोडगा काढण्यात आला नाही. काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी आज कवितेतून मोदींवर जोरदार निशाणा साधाला.
राहुल गांधी यांनी टि्वटमध्ये काही फोटोही शेअर केली आहेत. आंदोलक शेतकऱ्यांवर होणारे लाठीहल्ले, पाण्याच्या फवाऱ्याचा मारा, पोलिसांकडून शेतकऱ्यांना झालेल्या जखमा आणि कडाक्या थंडीतील शेतकऱ्यांचे आंदोलन हे राहुल गांधी यांनी फोटोतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना वीरांची उपमा दिली आहे. शेतकरी हे देशाचे अन्नदाते असून त्यांनी कोणालाही न घाबरता, पुढे चालत राहाव, असं राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांसाठी लिहलेल्या कवितेत म्हटलं आहे. जरी पाण्याचा-लाठ्याचा मारा झाला, तरी न घाबरता पुढे चालत राहवं, असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल यांची कविता...
वीर तुम बढ़े चलो
धीर तुम बढ़े चलो
वॉटर गन की बौछार हो