नवी दिल्ली: Rahul Gandhi T shirt Controversy: उत्तर भारतातील कडाक्याच्या थंडीत टी-शर्ट घालून का फिरत आहेत, या प्रश्नाचे उत्तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अखेर दिले. ते म्हणाले की, मीडिया मला थंडी वाजत नाही का असे विचारात आहे पण हाच प्रश्न शेतकरी, मजूर किंवा गरीब मुलांसाठी विचारला जात नाही. Rahul Gandhi Replied Over T Shirt
लाल किल्ल्यावरून राहुल गांधी म्हणाले :त्यांची भारत जोडो यात्रा शनिवारी राष्ट्रीय राजधानीत Bharat Jodo Yatra Delhi पोहोचली. जिथे गेल्या दोन दिवसांपासून तापमानात सातत्याने घट झाली Freezing Delhi Winters आहे. रविवारी दिल्लीत हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. “मी 2,800 किमी चाललो आहे, पण मला विश्वास आहे की ही काही मोठी गोष्ट नाही. शेतकरी दररोज एवढी पायपीट करतात; जसे शेतमजूर, कारखान्यातील कामगार – खरे तर संपूर्ण भारत,” लाल किल्ल्याजवळील एका मेळाव्याला संबोधित करताना राहुल गांधींनी हे भाष्य केले.
पुन्हा एकदा पांढऱ्या टी शर्टवर:दिल्लीतील कडाक्याच्या थंडीत फक्त टी-शर्ट घातलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी बुधवारी पुन्हा एकदा पांढऱ्या टी-शर्टवर दिसले. दिल्लीत अत्यंत थंड वातावरण असताना त्यांनी टी-शर्ट का घातला या पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, “टी-शर्ट ही चल रही है और जब तक चल रही है चलेंगे..