महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अॅप नाही, तर लशींचे डोस लोकांचे प्राण वाचवितात-राहुल गांधींचा मोदी सरकारला टोला - Rahul Gandhi over COWIN

राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले, की ज्यांच्याकडे इंटरनेटसारख्या सुविधा नाहीत, अशा लोकांनाही कोरोना होत आहे. आरोग्य सेतूला अयोग्य सेतू तर कोविन अॅपला नोविन अॅप, असे गांधींनी उपहासाने म्हटले आहे.

राहुल गांधी यांची मोदी सरकारवर टीका
राहुल गांधी यांची मोदी सरकारवर टीका

By

Published : May 10, 2021, 6:58 PM IST

हैदराबाद -देशभरात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला उपहासात्मक टोला लगावला आहे. अॅप्लिकेशन हे लोकांचे प्राण वाचवू शकत नाहीत. कोरोना प्रतिबंधात्मक लसच लोकांचे प्राण वाचवेल. हे अॅपवर अवलंबून असलेल्या सरकारने लक्षात घ्यावे, असे गांधी यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले, की ज्यांच्याकडे इंटरनेटसारख्या सुविधा नाहीत, अशा लोकांनाही कोरोना होत आहे. आरोग्य सेतूला अयोग्य सेतू तर कोविन अॅपला नोविन अॅप, असे गांधींनी उपहासाने म्हटले आहे.

राहुल गांधी यांचे ट्विट

हेही वाचा-बक्सरमध्ये गंगेकिनारी आढळले सुमारे ५० मृतदेह; पाहा विदारक दृश्य

राहुल गांधी यांनी दुसरे ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली आहे. कोरोनाच्या संकटात विदेशातून मदत मिळवित असल्याचे सारखे छाती थोपटून सागणे हे केविलवाणे आहे. जर काम केले असते तर अशी वेळ आली नसती.

राहुल गांधी यांचे ट्विट

हेही वाचा-सू मोटो सुनावणीत तांत्रिक अडचणी; सर्वोच्च न्यायालय १३ मे रोजी घेणार सुनावणी

पंतप्रधानांसाठी नवे घर असण्याची नव्हे तर देशाला ऑक्सिजनची आवश्यकता असल्याचे यापूर्वी गांधी यांनी ट्विट केले होते. त्यामध्ये ऑक्सिजन सिलिंडर आणि सेंट्रल व्हिस्टाच्या कामाचा फोटो जोडला होता.

राहुल गांधी यांचे ट्विट

दरम्यान, गेल्या 24 तासांत देशामध्ये 3,66,161 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 3,754 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सलग चौथ्या दिवशी देशात 4 लाखांहून अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये रोज 4 हजारांहून अधिक जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.

हेही वाचा-सू मोटो सुनावणीत तांत्रिक अडचणी; सर्वोच्च न्यायालय १३ मे रोजी घेणार सुनावणी

ABOUT THE AUTHOR

...view details