नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर असून रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. कोरोना परिस्थिती, लसींचा तुटवडा, ऑक्सिजन कमतरता आदी मुद्द्यांवरून गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी केंद्र सरकारला लक्ष्य करत आहेत. आज राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवरी टीका केली. देशात पसरलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला पंतप्रधान मोदी जबाबदार आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.
भारत हा जगातील वॅक्सीन कॅपिटल आहे. लसीकरण केल्यासच कोरोनापासून आपली सुटका होईल. जेथून लस खरेदी करता येईल. तेथून खरेदी करा आणि लसीकरण करा. सरकारने कारण देऊ नये. दुसऱ्यावर चुका ढकलणे नाही. तर मी करून दाखवेल, असं म्हणणं म्हणजे नेतृत्व. सरकारने आता वेळ वाया घालू नये. तसेच जे मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्य सांगत आहे. मग ते विरोधी पक्ष असो किंवा राज्यांचे मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी असो. त्यांचं सरकारने ऐकावं. दुसऱ्याला लाटेला हरवलं आहे, असे म्हणेपर्यंत कोरोनाची तीसरी लाटही येईल, असे राहुल गांधी म्हणाले.
कोरोनाच्या प्रसारात मोदींचा हात -
कोविडला मोविड लिहणाऱ्यावरून विचारलेल्या प्रश्नाला राहुल गांधींनी उत्तर दिले, की टुलकीटची गोष्ट पूर्णपणे खोटी आहे. मोदींनी प्रचार सभा घेत कोरोनाचा प्रसार होण्यास हातभार लावला. त्यामुळेच मी त्यांच्या नावाच्या पहिल्या अक्षराचा वापर केला. जेव्हा मोदी बंगालमध्ये प्रचार सभा घेत होते. तेव्हा ते कोविडची मदत करत होते. जेव्हा खरचं पाऊल उचलण्याची गरज होती. तेव्हा उचललं नाही. उलट कोरोनाची मदत केली, अशी टीका राहुल गांधींनी केली.
लसीकरण केल्यास कोरोनाचा पराभव शक्य -