महाराष्ट्र

maharashtra

कमला हॅरिस यांच्या 'या' वक्तव्यावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर साधला निशाणा

By

Published : Sep 25, 2021, 5:10 PM IST

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले असले तरी ते राहुल गांधी यांच्या निशाण्यावर राहिले आहेत. कमला हॅरिस यांनी लोकशाही वाचविण्यासाठी आवाहन केले आहे. त्यावरून काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी मोदी सरकावर टीका केली आहे.

राहुल गांधी
राहुल गांधी

नवी दिल्ली- अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी गुरुवारी वॉशिंग्टनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी हॅरिस यांनी जगभरातील लोकशाही धोक्यात असल्याचे वक्तव्य केले. यावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकावर टीका केली आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कमला हॅरिस यांचा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे. त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे, की जे लोकशाहीला हुकुमशाहीत आणण्याचा प्रयत्न करतात. त्यांना हे ऐकून आवडले नसेल. मोदीजी संकेत समजून घ्या, अशी फोटो कॅप्शनही राहुल गांधी यांनी पोस्टमध्ये दिली आहे.

राहुल गांधी यांची फेसबुक पोस्ट

हेही वाचा-सुरक्षा परिषदेवर भारत पाहिजे, जो बायडेन यांचे मत; हर्षवर्धन शृंगला यांची माहिती

यापूर्वीही राहुल गांधी यांनी मोदी सरकार हे लोकशाहीविरोधी असल्याची टीका केली होती. भारत देश आता 'लोकशाही राष्ट्र' राहिला नसल्याचे ट्विट काँग्रेस नेते राहुल गांधी 11 मार्च 2021 यांनी केले होते. स्वीडनमधील व्ही-डेम या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालाचा दाखला देत राहुल यांनी असे म्हटले होते. या अहवालात भारताचा समावेश निवडणूक लोकशाही सूचीमध्ये न करता, 'निवडणूक हुकूमशाही' या सूचीमध्ये केला आहे.

पंतप्रधान मोदी कमला हॅरिस भेट

हेही वाचा-भारताशी नाते असलेल्या कमला हॅरिस यांना पंतप्रधान मोदींनी या' दिल्या खास भेटवस्तू

जगातील सर्वात मोठा लोकशाही असणार देश ही ओळख संपली - अहवाल

जगातील सर्वात मोठी लोकशाही अशी ओळख असलेल्या देशात आता निवडणूक लोकशाही न राहता, निवडणूक हुकूमशाही आली आहे. गेल्या दशकभरात जगातील उदारमतवादी लोकशाही असलेल्या राष्ट्रांची संख्या ४१ वरुन ३२वर गेली आहे, अशी माहिती या अहवालात देण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदी कमला हॅरिस भेट

हेही वाचा-शुक्रवारी पार पडली क्वाडची बैठक; इंडो-पॅसिफिक क्षेत्रात मुक्त व्यापाऱ्याला प्रोत्साहन देण्याचा केला पुर्नउच्चार

काय म्हटले आहे कमला हॅरिस यांनी?

पंतप्रधान नरेंद्र आणि अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना कमला हॅरिस म्हणाल्या, की जगभरात लोकशाही धोक्यात आहे. लोकशाहीला वाचविण्याची गरज आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी भारताने साथ देण्याची गरज आहे. अमेरिका आणि भारताे एकत्रित मिळून लढण्याची गरज आहे. जर भारताकडून सहकार्य मिळाले तर त्याचे सकारात्मक परिणाम मिळू शकतात.

पंतप्रधान मोदींनी कमला हॅरिस यांनी दिल्या खास भेटवस्तू-

हॅरिस यांच्याबरोबरील द्विपक्षीय बैठक अत्यंत महत्त्वाची ठरल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याचे सूत्राने सांगितले. अत्यंत जिव्हाळ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी त्यांच्या आजोबांच्या पत्रांच्या प्रती दिल्या आहेत. हॅरिस यांचे आजोबा पी. व्ही. गोपालन हे केंद्र सरकारमध्ये वरिष्ठ आणि आदरणीय अधिकारी होती. त्यांनी विविध भूमिका पार पाडल्या होत्या, असे सरकारमधील सूत्राने सांगितले. जगातील सर्वात जुन्या शहरापैकी वाराणसी हे शहर आहे. वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आहे. या शहरामधील गुलाब मीनाकारी हा बुद्धिबळाचा सेटही त्यांना देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details