नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) काठमांडूतील एका नाईट क्लबमध्ये ( Rahul Gandhi Viral Video ) असतानाचा व्हिडिओ भलताच व्हायरल झाला आहे. यात राहुल गांधी एका डिस्कोमध्ये असून इतर लोक मद्य सेवन करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला ( Congress Spokesperson Randeep Surjewala ) यांनी, मित्रपरिवाराच्या कुटुंबांच्या लग्नसमारंभाला उपस्थित राहणे हे सभ्यतेचे लक्षण असल्याचे सांगत भाजपवर निशाणा साधला आहे.
या व्हिडीओमध्ये राहुल गांधी एका नाईट क्लबमध्ये आपल्या मैत्रिणीसोबत दिसत आहेत. यावेळी तिथे म्युझिक सुरु असून इतर लोक डान्स करताना दिसत आहे. तसेच मद्यपानही करत आहेत. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आणि विविध नेत्यांनी तोंडसुख घेतले आहे.
हा व्हिडिओ झाला व्हायरल
नेपाळची राजधानी असणाऱ्या काठमांडूमधील हा प्रसिध्द नाईट क्लब आहे. काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार, राहुल गांधी सोमवारी दुपारी नेपाळच्या राजधानीत दाखल झाले होते. म्यानमारमधील नेपाळचे माजी राजदूत भीम उदास यांनी सांगितले की, त्यांच्या मुलीने राहुल गांधींना लग्नाचे आमंत्रण दिले होते. सीएनएनची माजी वार्ताहर असलेली उदास यांची मुलगी सुम्निमा या निमा मार्टिन शेर्पा यांच्याशी लग्न करत आहे. त्यांच्या लग्नात सहभागी होण्यासाठी राहुल गांधी काठमांडूला गेले होते.