नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भारताची तुलना ( India compare to Sri Lanka ) श्रीलंकेशी केली आहे. बुधवारी त्यांनी महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सरकारवर ( Congress slammed Modi gov ) निशाणा साधला. भारताची स्थिती श्रीलंकेसारखी दिसत आहे. लक्ष विचलित केल्याने सत्य बदलणार नाही, असा टोला राहुल गांधी यांनी मोदी सरकारला लगावला आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी( Sri Lanka Crisis Rahul Gandhi ) ट्विट करत भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरून मोदी सरकावर ( Rahul Gandhi on Indian economy ) टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की लोकांचे लक्ष वळवल्याने वस्तुस्थिती बदलणार नाही. भारत श्रीलंकेसारखा दिसतो. त्यांनी ट्विटमध्ये ग्राफिक्सच्या माध्यमातून श्रीलंकेबरोर असलेल्या तीन गोष्टींची तुलना केली आहे. यात बेरोजगारी, पेट्रोलची किंमत आणि जातीय दंगल यांचा समावेश आहे. यामध्ये त्यांनी २०१२ ते २०२१ पर्यंतचे आकडेवारी दाखविला आहे. याआधीही राहुल गांधींनी भारताच्या आर्थिक स्थितीची श्रीलंकेशी तुलना केली आहे. ते म्हणाले होते की, श्रीलंकेत सत्य जनतेपासून लपवले गेले. त्याचप्रमाणे भारतातही भाजप आणि आरएसएसच्या लोकांनी देशातील जनतेपासून सत्य लपवले आहे. तेथे सत्य बाहेर आले आहे. भारतातही सत्य बाहेर येईल.
लोकांना दैनंदिन खर्च भागविण्यासाठी घ्यावे लागणार कर्ज-दरम्यान, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनी महागाईवरून सरकारवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, तुम्ही कष्टाने कमविलेल्या पैशाला महागाईमुळे फटका बसत आहे. मध्यमवर्गीय आणि गरीब वर्गाचे उत्पन्न वाढेल, असे भाजप सरकारचे एकही आर्थिक धोरण नाही. लोकांना त्यांचा दैनंदिन खर्च भागवण्यासाठी कर्ज घ्यावे लागणार नाही, अशी भीती वाटते.