नवी दिल्लीः काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी दिल्लीतील करोल बाग परिसरात असलेल्या एका बाजारपेठेत गेले. बाजारपेठेत जाताच बरोबर राहूल गांधींना नागरिकांनी घेराव घातला आणि फोटो काढण्यासाठी गर्दी करू लागले. यावेळी राहुल गांधींनी गॅरेजमध्ये जात मॅकेनिकसोबत संवाद साधला. इतकेच नाहीतर राहुल गांधींनी आपल्या हाताची कमाल दाखवत तेथील दुचाकीवर स्क्रू ड्राव्हर चालवला. राहुल गांधींनी यासर्व घटनेची माहिती त्यांनी आपल्या इंस्टाग्रामवर दिली आहे. मॅकेनिकसोबत काम करत असल्याचा राहुल गांधींचा एक फोटो इंस्टाग्रामवर खूप व्हायरल होत आहे. या फोटोला इंस्टाग्रामवर राहुल गांधींनी एक कॅप्शन दिले आहे. पाना फिरवणाऱ्या आणि भारताची चाके फिरवणाऱ्या हातांकडून शिका, अशा प्रकारचे कॅप्शन राहुल गांधींनी दिले आहे.
पाणीपुरीवर ताव मारला : मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी मंगळवारी रात्री साडे 9वाजण्याच्या सुमारास दिल्लीतील करोल बाग बाजारपेठेत गेले होते. तेथे त्यांनी मॅकेनिकशी संवाद साधला. राहुल गांधींच्या या गॅरेज भेटीचे फोटो त्यांनी आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये राहुल गांधींच्या हातात पाना आणि बाईकचे काही पार्ट दिसत आहेत. राहुल गांधींनी मॅकेनिककडून बाईकच्या इंजिनविषयी माहिती घेतली. यावेळी राहुल गांधींनी आपल्या हाताची कमाल दाखवत गॅरेजमध्ये काम केले. दुचाकीचा नट फिट करत असताना राहुल गांधींचे काही फोटो व्हायरल होत आहेत. त्यानंतर त्यांनी मॅकेनिशी चर्चा केली. त्यांनतर राहुल गांधींनी बंगाली मार्केट आणि चांदणी चौकातील पाणीपुरी, चाट आणि सरबतवर ताव मारला.