लडाख :काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लेह लडाखला भेट देऊन पँगॉग तलावाच्या काठावर दिवंगत काँग्रेस नेते राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. यावेळी राहुल गांधी यांनी चीननं भारताची जमीन हडपल्याचा दावा करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा खोटा असल्याचा आरोप केला. इथच्या नागरिकांना बोलल्यानंतर त्यांनी चीनच्या पीपल लिबरेशन आर्मीनं भारताची जमीन हडप केल्याचा दावा केला. मात्र तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीननं भारताची एक इंचही जमीन घेतली नसल्याचा दावा करत असून हे गंभीर असल्याचं राहुल गांधी यांनी यावेळी स्पष्ट केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा खोटा :पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या पीपल लिबरेशन आर्मीनं त्यांच्या कार्यकाळात एक इंचही भारतीय जमीनीवर ताबा केला नसल्याचा दावा केला होता. त्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी पँगॉग तलावाला भेट देऊन त्यांचे वडील तथा दिवंगत काँग्रेस नेते राजीव गांधी यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी राहुल गांधी यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असल्याचा दावा खोटा असल्याचं यावेळी सांगितलं.
चीनी सैनिकांनी घेतली जमीन हिसकावून :राहुल गांधी यांनी पँगॉग येथील शेतकऱ्यांना याबाबत विचारलं असता, त्यांनी आमची जमीन चीनच्या सैन्यानं हिसकावल्याचं सांगितल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. आमची जमीन चीननं घेतल्यानं आम्हाला चिंता होत असल्याचंही येथील नागरिकांनी यावेळी सांगितल्याचा दावा राहुल गांधी यांनी यावेळी केला आहे. स्थानिक नागरिक जमीन चीनी सैन्यानं हिसकावल्याचं सांगित आहेत, मात्र दुसरीकडं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमची एक इंचही जमीन चीननं हिसकावली नसल्याचा दावा करत आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितलं.
जम्मू-काश्मीर विभाजनावरुन नागरिक नाराज :केंद्र सरकारनं जम्मू काश्मीरचं विभाजन करुन लढाखला केंद्र शासित राज्याचा दर्जा दिला आहे. मात्र लढाखला केंद्र शासित दर्जा दिल्यावरुनही नागरिक समाधानी नसल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. लढाखमध्ये प्रचंड बेरोजगारी आहे. त्यांना अधिक प्रतिनिधीत्व हवं आहे, असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले. राज्य नोकरशाहीनं नाही, तर लोकप्रतिनिधींनी चालवलं पाहिजे, असंही राहुल गांधींनी यावेळी स्पष्ट केलं.
हेही वाचा -
- Rahul Gandhi Pay Tribute To Rajiv Gandhi : राहुल गांधी आज पँगॉग तलावाकाठी वडील राजीव गांधींना वाहणार आदरांजली