नवी दिल्ली - कोरोना लशींवर वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू होत असल्याने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. लोकांचे प्राण जाऊ शकतात. मात्र, पंतप्रधानांची कर वसुली थांबू शकत नाही, असा टोला गांधी यांनी सरकारला लगावला आहे.
राहुल गांधी यांनी ट्विट करून कोरोना लशींवर लागू होणाऱ्या जीएसटीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी कोरोना लशींवर लागू होणाऱ्या ५ टक्के जीएसटीवरून प्रश्न उपस्थित केले होते.
हेही वाचा-ओडिशाच्या आईन्स्टाइनची ही कहाणी बघायलाच हवी!
राज्यांचाही कोरोना लशींवरील जीएसटीला विरोध
- लशींवर ५ टक्के जीएसटी लागू होत असल्याने राज्यांना लशींच्या प्रति डोससाठी १५ ते २० रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहेत.
- भारतामध्ये उत्पादन होणाऱ्या लशींवर लागू होणाऱ्या जीएसटीवर राजस्थान आणि छत्तीसगडने विरोध केला आहे.
- ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून कोरोना लशींवरील जीएसटी माफ करण्याची मागणीदेखील केली आहे.