दिल्ली -माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज (गुरूवार ) जयंती आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शक्तीस्थळ येथील इंदिरा गांधींच्या समाधीवर जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. कार्यकुशल पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रभावशाली नेतृत्वाच्या आठवणी देशाला अद्यापही आहे. मी आजीच्या रुपात त्यांची आठवण करतो तसेच त्यांनी शिकवलेल्या गोष्टी मला नेहमी प्रेरीत करतात, असे राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
भारताच्या पहिल्या पंतप्रधान -
इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या आणि आतापर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान आहे. इंदिरा गांधी या बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि आर्थिक तसेच सामाजिक सुधारणेसाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयांसाठी प्रसिद्ध आहेत. इंदिरा गांधी यांनी जानेवारी 1966पासून मार्च 1977पर्यंत त्यांनी पंतप्रधानपद भूषवले आहे. यानंतर 14 जानेवारी 1980पासून 31 ऑक्टोबर 1984 या हत्येच्या दिवसापर्यंत त्या पंतप्रधान होत्या. इंदिरा गांधी या पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सर्वाधिक काळ देशाच्या पंतप्रधान होत्या. 31 ऑक्टोबर 1984 रोजी नवी दिल्लीतील सफदरजंग रोड इथल्या निवासस्थानी अंगरक्षकांनी इंदिरा गांधी यांची गोळ्या झाडून हत्या केली होती.
हेही वाचा -प्रणव मुखर्जींबद्दल काय म्हणाल्या होत्या इंदिरा गांधी, जाणून घ्या...