राहुल गांधी संसदेत बोलताना नवी दिल्ली : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी आज मंगळवार (7 जानेवारी) लोकसभेत बोलताना भारत जोडो यात्रेबद्दल काही गोष्टी सांगितल्या. त्यावेळी त्यांनी अग्निवीर योजनेला धरून मोदी सरकारला जोरदार झोडपले आहे. यात्रेत तरुणांनी सांगितले की, पूर्वी आम्हाला सेवा आणि पेन्शन मिळायचे, पण आता ४ वर्षांनी आम्हाला काढून टाकले जाईल अशी खंत व्यक्त केली. तसेच, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, अग्निवीर योजना आमच्याकडून नाही तर आरएसएस आणि इटमधून आली आहे असा थेट घणाघात राहुल यांनी यावेळी बोलताना केला आहे.
अजित डोवाल यांनी या योजनेसाठी लष्करावर दबाव आणला : अग्निवीर योजना लष्कराकडून नव्हे तर आरएसएस, गृह मंत्रालयाकडून आली असल्याचे निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले असे राहुल गांधी म्हणाल्यानंतर संसदेत मोठ्या प्रमाणात गोंधळ पाहायला मिळाला आहे. अग्निवीर योजना लष्करावर लादली जात आहे असही ते यावेळी म्हणाले आहेत. यावेळी निवृत्त अधिकार्यांनी सांगितले की, लोकांना शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे आणि नंतर त्यांना समाजात परत येण्यास सांगितले जात आहे, यामुळे हिंसाचार वाढेल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. अग्निवीर योजना लष्कराकडून आली नाही आणि एनएसए अजित डोवाल यांनी या योजनेसाठी लष्करावर दबाव आणला हे त्यांच्या (निवृत्त अधिकाऱ्यांच्या) मनात आहे असही ते बोलले आहेत.
राहुल गांधी यांचे थेट आरोप : आपल्या भारत जोडो यात्रेचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, यादरम्यान त्यांनी बेरोजगारी, महागाईपासून शेतकऱ्यांपर्यंतच्या समस्या ऐकल्या आहेत. देशातील तरुणांना सरकारची अग्निवीर योजना मान्य नाही असही ते म्हणाले आहेत. या योजनेमुळे आपले सैन्य आणखी कमकुवत होणार आहे असही ते म्हणाले आहेत. तसेच, अग्निवीर ही योजना लष्कराकडून नाही तर आरएसएसकडून आणि (NSA) अजित डोवाल यांच्या सांगण्यावरून ती आली आहे असा थेट आरोप राहुल यांनी केला आहे.
लोकसभेत मोठा गदारोळ : सरकारने अग्निवीर योजना जाहीर केल्यानंतर बेरोजगार तरुणांनी रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केले. मात्र, यातील दुसरी बाब अशीही होती की, भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मोठ्या संख्येने तरुणांनी अग्निवीर योजनेसाठी अर्ज केले. तसेच, लष्करातील निवृत्त अधिकारी म्हणत आहेत, की अग्निवीर योजना लष्कराची नाही. ही योजना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आली आहे. गृह मंत्रालयाकडून आली आहे. हे लष्करावर लादण्यात आले आहे. समाजात बेरोजगारी आहे, अग्निवीरानंतर समाजात हिंसाचार वाढेल. अजित डोवाल यांचे नाव घेतल्यावर सत्ताधारी पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला आणि तुम्ही त्यांचे नाव घेऊ शकत नाही, असे सांगण्यात आले. यावरून लोकसभेत मोठा गदारोळ झाला.
हेही वाचा :अदानींची संपत्ती आठ वर्षात ८ अब्ज डॉलर्सवरून १४० अब्ज डॉलर्स कशी झाली? राहुल गांधींचा सवाल