महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Congress Protest : राहुल गांधींच्या शिक्षेविरोधात काँग्रेस आक्रमक, रणनीती आखून राजधानीत काढणार मोर्चा

राहुल गांधींना दोषी ठरवल्याबद्दल काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात आंदोलनाचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत रणनीती आखण्यासाठी आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे.

Rahul Gandhi
राहुल गांधी

By

Published : Mar 24, 2023, 10:08 AM IST

Updated : Mar 24, 2023, 10:36 AM IST

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांना गुरुवारी सुरत न्यायालयाने मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर, पक्षाने येत्या काही दिवसांत सर्व समविचारी पक्षांना सामील करून मोठ्या विरोध प्रदर्शनाची योजना आखली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी विरोधी पक्षांची बैठक बोलावली असून, त्यानंतर सर्व खासदार विजय चौकाकडे कूच करतील.

द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीची मागणी :देशव्यापी आंदोलनाची आखणी करण्यासाठी सर्व प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांची शुक्रवारी संध्याकाळी बैठक बोलावण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेतृत्वाने या मुद्द्यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीचीही मागणी केली आहे. खरगे यांच्या निवासस्थानी झालेल्या काँग्रेस खासदार आणि सुकाणू समितीच्या सदस्यांच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले, 'हा केवळ कायदेशीर मुद्दा नसून तो राजकीयही आहे, कारण सत्ताधारी पक्षाला विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकावायचे आहे'.

दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा : गुरुवारी सकाळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावाबद्दल केलेल्या टिप्पणीबद्दल 2019 च्या मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी दोषी आढळले आणि त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. तथापि, त्यानंतर त्यांना लगेच जामीन मंजूर करण्यात आला आणि सुरत न्यायालयाच्या निकालाविरुद्ध अपील करण्याची परवानगी देण्यासाठी त्यांची शिक्षा 30 दिवसांसाठी स्थगित करण्यात आली.

2019 मधील प्रकरण : 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकात प्रचारादरम्यान 'सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे असू शकते', असे म्हटल्याबद्दल भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, 'हे सरकार स्पष्टपणे संसदेच्या आत विरोधकांचा आवाज चिरडण्यासाठी एका रणनीतीवर काम करते आहे आणि बाहेरही दुसऱ्या रणनीतीचा अवलंब करत आहे. त्यामुळे संसदेबाहेर काही बोलले तर ते सभागृहाचे कामकाज चालू देणार नाहीत.

हेही वाचा :Sharad Pawar On EVM : ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यास मत नेहमीच भाजपला जाते, विरोधकांनी 'हे' उपस्थित केले प्रश्न

Last Updated : Mar 24, 2023, 10:36 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details