नवी दिल्ली -गोव्यामध्ये दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्काराचे प्रकरण ताजे असतानाचा दिल्लीमध्ये एका नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऐवढेच नव्हे, तर आरोपींनी मुलीवर जबरदस्तीने अंत्यसंस्कार देखील केले आणि तिच्या कुटुंबाला विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची खोटी माहिती दिली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी सकाळी पीडित कुटुबांची भेट घेतली. यापूर्वी मंगळवारी राहुल गांधींनी टि्वट करून घटनेचा निषेध व्यक्त केला. दलिताची मुलगीही देशाची मुलगी आहे, असं राहुल गांधी म्हणाले.
मी पीडितेच्या कुटुंबीयांशी बोललो. त्यांच्यावर अन्याय झाला असून त्यांना न्याय हवा आहे. त्यांना मदतीची गरज असून ती आम्ही करू. न्याय मिळेपर्यंत राहुल गांधी तुमच्यासोबत असेन, असे मी त्यांना आश्वासन दिले आहे आहे, असे राहुल गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर सांगितलं.
दिल्लीच्या नांगलमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पीडित मुलगी आपल्या कुटुंबासोबत स्मशानभूमी समोर एका किरायाच्या घरात वास्तव्याला होती. रविवारी संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास स्मशानभूमीत असणाऱ्या कूलरमधून थंड पाणी आणण्यासाठी घराबाहेर पडली. मात्र, बराच काळ झाला, तरी परतली नाही. तेव्हा सहाच्या सुमारास स्मशानभूमीतील पुजारी राधेश्याम आणि पीडितेच्या आईच्या ओळखीतल्या काही जणांनी त्यांना बोलावलं आणि मृतदेह दाखवला. विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी पीडितेच्या आईला पोलिसांना सूचना देण्यास मनाई केली. पोलीस खटला दाखल करेल आणि शवविच्छेदनादरम्यान अवयव चोरले जातील, म्हणून अंतिम संस्कार करणे योग्य राहिल, असे त्यांनी पीडितेच्या आईला सांगितले आणि जबरदस्तीने अंतिम संस्कार केले.
महिलेने पतीला फोन करून सर्व माहिती दिली. महिलेने स्मशानभूमीम हंगामा केल्यानंतर जवळपास 200 पेक्षा जास्त लोकांची गर्दी जमली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी दाखल झाले. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यत आला आहे. मुलीचे ओठ निळे पडले होते. तीच्या हातावरही जखमा होत्या, अशी माहिती पीडितेच्या आईने पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे जमा केले असून तपास सुरू केला आहे.
महिला आयोगाची दिल्ली पोलिसांना नोटीस -