नवी दिल्ली - पेगास हेरगिरी प्रकरणावरून विरोधी पक्षांनी संसदेमध्ये सरकारला घेरण्याची तयारी चालविली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना नाष्ट्यासाठी कॉन्स्टिट्यूशनल क्लबमध्ये आमंत्रित केले होते. सर्व शक्तींची एकजूट करणे, ही माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची बाब असल्याचे राहुल गांधींनी बैठकीत सांगितले.
राहुल गांधींच्या बैठकीत डावे पक्ष, शिवसेना, द्रमुक, राजद, तृणमू काँग्रेससह इतर विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. राष्ट्रवादी पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल व खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते.
यावेळी आम आदमी पक्षाचे नेते गैरहजर होते. सर्व शक्तींची एकजूट करणे, ही माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची बाब आहे. जेवढे लोक एकत्रित, तितका आवाज शक्तीशाली होईल. त्यामुळे भाजप-आरएसएसला दाबून टाकणे कठीण होईल, असे राहुल गांधींनी विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत सांगितले.
बैठकीनंतर विरोधी पक्षनेते हे सायकलीने संसदेच्या दिशेने जात आहेत.
सोमवारी संसद भवनमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांच्या कक्षात विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत नेत्यांनी संसदेमध्ये पेगाससवर चर्चा करण्याची गरज व्यक्त केले. तसेच त्याबाबत मागणी लावून धरण्याचा निश्चय व्यक्त केला. सुत्राच्या माहितीनुसार प्रति संसदेचे आयोजन करण्याचे काही विरोधी पक्षनेत्यांनी संकल्पना मांडली आहे. त्याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा-जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य आणि पूर्णत: भाग - टी. एस. त्रिमुर्ती