लखनौ -काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे लखीमपूरला जाण्यासाठी लखनौला आज (६ ऑक्टोबर) पोहोचणार असल्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षातील सुत्राच्या माहितीनुसार राहुल गांधी हे चार्टर विमानाने लखनौला येऊ शकतात. मात्र, त्याबाबत दुजोरा मिळालेला नाही. मात्र, सुत्राच्या माहितीनुसार राहुल गांधींनी कार्यक्रम निश्चित केला आहे.
लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर राजकीय वातावरण तापले आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या महासचिव आणि उत्तर प्रदेशच्या काँग्रेस प्रभारी प्रियंका गांधी गेल्या तीन दिवसांपासून लखीमपूरला जाण्यासाठी सीतापूरला ठाण मांडून बसल्या आहेत.
संबंधित बातमी वाचा-लखीमपूर खीरी हत्याकांत : भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर चढवली गाडी; आठ जणांचा मृत्यू
सुरुवातीला पोलिसांनी प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतले होते. मंगळवारी त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले आहे. प्रियंका गांधी यांना प्रोत्साहन देण्यासाठी राहुल गांधींनी ट्विट केले होते. मात्र, प्रियंका गांधी यांना अटक करण्यात आली. त्यानंतर राहुल गांधींनीही लखनौला येण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी हे लखनौवरून लखीमपूरला जाणार आहेत.
संबंधित बातमी वाचा-Lakhimpur Kheri Violence : जमावबंदी आदेशाच्या उल्लंघन प्रकरणी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना यूपी पोलिसांकडून अटक