दिल्ली : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी आपला सरकारी बंगला आज खाली केला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी मोदी सरकार राहुल गांधींना लक्ष करत आहेत. तसेच, हे सगळे राजकीय सुडापोटी केले जात आहे असही ते यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान, यावेळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी तसेच पक्षाचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी यांनी गेली अनेक वर्षापासून बंगल्यात कर्मचारी म्हणून जे काम करतात त्यांची भेट घेत त्यांना हस्तांदोल केले. तसेच, त्यांच्यासोबत फोटोही काढले. राहुल गांधी यांना हा बंगला त्यांना खासदार म्हणून देण्यात आला होता. जवळपास दोन दशकांपासून ते या बंगल्यात राहत होते. आता राहुल गांधी हे आपल्या आई सोनिया गांधी यांच्यासोबत त्यांच्या १०, जनपथ या निवासस्थानी राहणार आहेत.
गुजरात उच्च न्यायालयात आव्हान देणार : सुरत येथील न्यायालयाने राहुल गांधी यांना (दि. 23 मार्च)रोजी मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले. त्यामध्ये राहुल यांना दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर त्यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले. अपात्र ठरवल्यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांना 22 एप्रिलपर्यंत बंगला रिकामा करण्यास सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आपला बंगला आज खाली केला आहे. सुरत न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशाला राहुल गांधी यांनी आव्हान दिले होते. परंतु, न्यायालयाे त्यांचे अपील फेटाळले आहे. आता सत्र न्यायालयाच्या आदेशाला पुढील आठवड्यात गुजरात उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याचे काँग्रेस पक्षाने म्हटले आहे.