महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Rahul Gandhi Visit Kedarnath : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकणार राहुल गांधी, आज घेणार केदारनाथाचं दर्शन

Rahul Gandhi Visit Kedarnath : काँग्रेस नेते राहुल गांधी आज केदारनाथला पोहोचणार आहेत. दरम्यान, ते बाबा केदार यांची भेट घेऊन प्रार्थना करणार आहेत. उत्तराखंड काँग्रेस प्रदेशाध्यक्ष करण महारा यांनी ही माहिती दिली आहे.

Rahul Gandhi Visit Kedarnath
Rahul Gandhi Visit Kedarnath

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 5, 2023, 10:30 AM IST

Updated : Nov 5, 2023, 12:28 PM IST

डेहरादून (उत्तराखंड)Rahul Gandhi Visit Kedarnath :काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी आज केदारनाथ दौऱ्यावर जाणार आहेत. उत्तराखंड काँग्रेस प्रदेशाध्यक्ष करण महारा यांनी सांगितले की, राहुल रविवारी उत्तराखंडच्या एक दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. दुपारी 11.15 वाजता ते जॉली ग्रँट विमानतळावरून हेलिकॉप्टरनं केदारनाथ धामकडे प्रयाण करतील. केदारनाथमध्ये बाबा केदार यांचं दर्शन आणि विशेष पूजा होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

8 वर्षांनंतर बाबा केदारला राहुल गांधी देणार भेट : राहुल गांधी याआधी 2015 मध्ये केदारनाथ धामला पोहोचले होते. आज 8 वर्षांनंतर राहुल गांधी दुसऱ्यांदा केदारनाथला येत आहेत. राहुल यांच्या या भेटीचं वर्णन धार्मिक स्वरुपाचं असल्याचं सांगितलं जातय. राहुल गांधी पहिल्यांदा केदारनाथला आले होते, तेव्हा ते पायीच केदारनाथला पोहोचले होते. मात्र यावेळी ते हेलिकॉप्टरने केदारनाथ धामला पोहोचतील. त्यानंतर दर्शन घेऊन परततील.

केदारनाथ धाममध्ये राहुल गांधी करणार प्रार्थना : राहुल गांधी केदारनाथमध्ये सुमारे 1 तास वेळ घालवतील. या दौऱ्यात काँग्रेसचे काही ज्येष्ठ नेतेही त्यांच्यासोबत दिसण्याची शक्यता आहे. केदारनाथ धाम येथे प्रार्थना केल्यानंतर राहुल गांधी पाच राज्यांमध्ये प्रचार करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे ज्यावेळी राहुल गांधी केदारनाथ धामवर पोहोचणार आहेत, त्याचवेळी मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे पीठाधीश्‍वर धीरेंद्र शास्त्रीही केदारनाथ दर्शनासाठी धाममध्ये उपस्थित राहणार आहेत.

केदारनाथ आणि बद्रीनाथमध्ये व्हीव्हीआयपी नेत्यांची हजेरी : पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राहुल यांच्या या धार्मिक दौऱ्यावर सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे. यावर्षी अनेक व्हीव्हीआयपी मंडळी, नेते भगवान केदारनाथ आणि बद्रीनाथच्या दर्शनासाठी पोहोचत आहेत. अलीकडेच 12 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी आदि कैलाश बाबांच्या दर्शनासाठी पिथौरागढला पोहोचले होते आणि आता राहुल गांधी केदारनाथ धामला पोहोचत आहेत.

  • केदारनाथ धाममध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था : आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार राहुल गांधी या काळात राजकारणाशी संबंधित कोणत्याही सभेत किंवा कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. त्याचवेळी अचानक झालेल्या या कार्यक्रमानंतर उत्तराखंड पोलिसांनी केदारनाथ धाममध्येही कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आलीय.

हेही वाचा :

  1. Parliament Monsoon Session 2023 : मणिपूर हिंसाचारावरुन राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल, म्हणाले आज अदानीवर बोलणार नाही
  2. Sanjay Raut : पंतप्रधानांना प्रकल्प आणण्याऐवजी महापालिका निवडणूक जिंकण्यात रस-संजय राऊत
  3. Political Reaction : शरद यादव यांच्या जाण्याने भारतीय राजकारणात कधीही भरून न येणारी हानी...राजकीय वर्तुळात शोककळा
Last Updated : Nov 5, 2023, 12:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details