गुवाहाटी ( आसाम ) : गुप्तचर संस्थांकडून लक्ष्य केले जात असल्याचा दावा करत भारताची परदेशी भूमीवर बदनामी केल्याचा आरोप आसामचे मुख्यमंत्री हिमंता विश्व सरमा यांनी शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधींवर केला. यावेळी विविध विषयांवर त्यांनी राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला. तत्पूर्वी केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनीही राहुल गांधी यांची निंदा केली. राहुल गांधी यांचे वक्तव्य चुकीचे आणि भारताची बदनामी करणारे आहे, असे ते म्हणाले होते. काँग्रेसच्या या वृत्तीमुळे अधोगती होत असल्याचे ते म्हणाले.
पॉइंट टू पॉइंट प्रत्युत्तर : ट्विटच्या मध्यमातून भाजप नेते अनुराग सिंह ठाकूर यांनी राहुल गांधींच्या विधानाला पॉइंट टू पॉईंट प्रत्युत्तर दिले, राहुल गांधींच्या आरोपात काहीही तथ्य नसल्याचा दावा केला. तर हिमंता विश्व सरमा यांनी ट्विट केले की, पहिले विदेशी एजंट आम्हाला टार्गेट करतात. मग आपलेच परदेशी आपल्याला जमिनीवर लक्ष्य करतात. ते म्हणाले की, राहुल गांधींचे केंब्रिजमधील वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने परदेशी भूमीवर भारताची बदनामी करण्याचा खोटा प्रयत्न होता.