आंबटपल्ली (तेलंगणा) Rahul Gandhi in Telangana : काँग्रेस नेते राहुल गांधी गेले तीन दिवस तेलंगणाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज तिसऱ्या दिवशी जयशंकर यांच्या भूपालपल्ली जिल्ह्याच्या दौऱ्याचा एक भाग म्हणून अंबटपल्ली, महादेवपूर मंडल इथं आयोजित महिला सक्षमीकरण परिषदेत भाग घेतला. अभिजातांचे तेलंगण आणि जनतेचं तेलंगण यांच्यात निवडणुका सुरू असून तेलंगणातील संपत्तीचं शोषण होत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय.
केसीआर सरकारवर जोरदार टीका : याठिकाणी बोलताना राहुल गांधींनी केसीआरवर जोरदार हल्लाबोल केलाय. कालेश्वरम प्रकल्प केसीआरसाठी एटीएमसारखा झाला आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. तसंच बीआरएस सरकार तेलंगणातील जनतेच्या पैशांचं शोषण करत असल्याची टीका त्यांनी केली. ते म्हणाले की, काँग्रेस सत्तेवर आल्यावर स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर 500 रुपयांना देईल. केसीआर यांनी चोरलेले पैसे महिलांच्या खात्यात टाकले जातील. महिलांना टीएसआरटीसी बसमध्ये मोफत प्रवास करण्याची सुविधा देण्यात येणार, महालक्ष्मी योजनेंतर्गत प्रत्येक महिलेला अडीच हजार रुपये देण्यात येणार आहेत. बीआरएस, एमआयएम आणि भाजपा हे तीन पक्ष सोबतच उभे आहेत, असा आक्षेप त्यांनी घेतला. त्यामुळंच या निवडणुकीत काँग्रेसला विजयी करून जनतेचं सरकार बनवा, असं राहुल गांधी यांनी जनतेला सांगितलं.