महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Rahul Gandhi : पहिल्याच कॅबिनेट बैठकीत सर्व 5 आश्वासने पूर्ण केली जातील, राहुल गांधींची कर्नाटकच्या जनतेला हमी - Siddaramaiah

सिद्धरामय्या यांनी आज कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची तर डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाला सत्तेत येण्यासाठी मदत केल्याबद्दल राज्यातील जनतेचे आभार मानले.

Rahul Gandhi
राहुल गांधी

By

Published : May 20, 2023, 4:56 PM IST

बेंगळुरू : राहुल गांधी यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला विजय मिळवून दिल्याबद्दल राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. कर्नाटकच्या जनतेने भाजपच्या द्वेषयुक्त राजकारणाचा आणि पैशाच्या शक्तीचा पराभव केला,असे ते म्हणाले. यासोबतच निवडणुकीपूर्वी पक्षाने दिलेल्या ५ हमींची पूर्तता करण्याचे आश्वसनही त्यांनी यावेळी दिले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १३५ तर भाजपने ६६ जागा जिंकल्या. तर जेडीएसला केवळ १९ जागांवर समाधान मानावे लागले.

राज्यातील जनतेचे आभार मानले : राज्यातील नव्या सरकारमध्ये सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री आणि डी. के. शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. बंगळुरुतील कांतीरवा स्टेडियमवर झालेल्या कार्यक्रमात राहुल यांनी पक्षाला सत्तेत येण्यासाठी मदत केल्याबद्दल राज्यातील जनतेचे आभार मानले. ते म्हणाले की, 'तुम्ही काँग्रेसला पूर्ण पाठिंबा दिला यासाठी तुमचे धन्यवाद. काँग्रेसच्या विजयानंतर आम्ही निवडणूक कशी जिंकली याबद्दल खूप काही लिहिले गेले, वेगवेगळी विश्लेषणे झाली, पण मला सांगायचे आहे की काँग्रेस जिंकली कारण आम्ही गरीब, दलित आणि मागासलेल्यांच्या पाठीशी उभे राहिलो.'

गरीब जनता आमच्यासोबत होती. भाजपकडे पैसा, सत्ता आणि सर्व काही होते, पण कर्नाटकच्या जनतेने त्यांचा पराभव केला. लोकांनी भ्रष्ट भाजपचा पराभव केला. आम्ही द्वेष नष्ट केला आणि प्रेम आणले. द्वेषाच्या बाजारात आम्ही प्रेमाची अनेक दुकाने उघडली आहेत.- राहुल गांधी

पाच हमींची पूर्तता करणार : राहुल गांधींनी लोकांना पक्षाने जाहीर केलेल्या पाच हमींची पूर्तता करण्याची खात्री दिली आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत काँग्रेसने दिलेल्या पाच हमीपत्रांना कायद्याचे स्वरूप येईल, असे राहुल गांधी म्हणाले.

आम्ही खोटी आश्वासने देत नाही, आम्ही सांगतो तेच करतो. आजच सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. या बैठकीत या आश्वासनांना कायदाचे स्वरुप मिळेल. आम्ही तुम्हाला स्वच्छ आणि भ्रष्टाचारमुक्त सरकार देऊ. कर्नाटकातील हे सरकार जनतेचे सरकार असून ते तुमच्यासाठी मनापासून काम करेल. - राहुल गांधी

यांनी घेतली शपथ : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी शनिवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ते दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनले आहेत. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी सिद्धरामय्या यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष जी परमेश्वरा, एम बी पाटील, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक खरगे, ज्येष्ठ नेते केएच मुनियप्पा, केजे जॉर्ज, सतीश जारकीहोली, रामलिंगा रेड्डी आणि बीझेड जमीर अहमद खान यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

हेही वाचा :

  1. Karnataka CM Oath Ceremony : सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री तर डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री पदाची घेतली शपथ
  2. KCR On BRS Model In Country : विकासाचे बीआरएस मॉडेल भारतभर नेणार; बीआरएसने सुरू केली 288 मतदार संघात लढण्याची तयारी - केसीआर
  3. Child At King Charles Coronation : राजा चार्ल्सच्या राज्याभिषेकासाठी 'या' सात वर्षांच्या मुलाला बोलावले होते, जाणून घ्या काय आहे खास

ABOUT THE AUTHOR

...view details