महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Rahul Gandhi News: केसीआरसह एआयएमआयएम नेत्यांवर एकही खटला नाही, कारण... राहुल गांधींची पंतप्रधानांवर टीका - राहुल गांधी हैदराबादमध्ये

Rahul Gandhi News : राहुल गांधी तेलंगणात म्हणाले की, काँग्रेस फक्त भारत राष्ट्र समितीसोबत लढत नाही, तर भाजपा आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) यांच्याशी लढत आहे. ते सगळे वेगळे पक्ष आहेत, असं म्हणतात. मात्र, ते संगनमताने एकत्र काम करत आहेत. (Rahul Gandhi on PM Modi)

Rahul Gandhi News
राहुल गांधी

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2023, 10:29 PM IST

हैदराबादRahul Gandhi News :काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज बीआरएसला 'भाजपा रिश्तेदार समिती' असे संबोधलं आहे. सरकारी यंत्रणांकडून विरोधी नेत्यांवर हल्ला होत आहेत. मात्र, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि एआयएमआयएम नेत्यांवर कोणतेही खटले नाहीत, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना आपलं मानतात. बीआरएसनं कृषी कायदे, जीएसटी आणि राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुकांवर भाजपाला समर्थन दिलंय, असं राहुल गाधींनी सांगितलंय. (Rahul Gandhi on PM Modi)

विरोधी पक्षाच्या नेत्याविरुद्ध खटला :आमच्या बैठकीत अडथळा आणायचा म्हणून आज बीआरएस, भाजपा, एआयएमआयएम या तिन्ही पक्षांनी बैठका घेतल्या होत्या. पण ते अडथळा आणू शकले नाहीत. 'काँग्रेस पक्षाला रोखण्यासाठी नवा मार्ग शोधावा लागेल', असा दावा राहुल गांधी यांनी केलाय. ते म्हणाले की, प्रत्येक विरोधी पक्षाच्या नेत्याविरुद्ध खटला आहे. अंमलबजावणी संचालनालय, केंद्रीय अन्वेषण ब्यूरो आणि आयकर विभाग अशा सरकारी संस्था त्यांच्या मागे आहेत. (No case against KCR AIMIM leaders)

केसीआर आणि एआयएमआयएम नेत्यांवर हल्ला :परंतु केसीआर, एआयएमआयएमवर यांच्यावर कोणताही खटला नाही. फक्त विरोधी पक्षांवर हल्ला केला जातो. पंतप्रधान मोदी कधीही आपल्या लोकांवर हल्ला करत नाहीत, असं म्हणत राहुल गांधींनी बीआरएस अध्यक्ष केसीआर आणि एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. तसंच ते म्हणाले की, सोनिया गांधी जे बोलतात, ते पूर्ण करतात. यावेळी त्यांनी काँग्रेसने तेलंगणा निर्मितीचं आश्वासन कसं पूर्ण केलं, त्याची आठवण करून दिलीय.

कॉंग्रेस पक्षाच्या सहा हमी :राहुल गांधी यांनी तेलंगणासाठी पक्षानं जाहीर केलेल्या सहा हमींचंही स्पष्टीकरण दिलंय. पहिल्या हमीत ज्यांच्याकडे घर नाही, अशा लोकांना घर बांधण्यासाठी 5 लाख रुपये दिले जातील. या योजनेंतर्गत तेलंगणा राज्यत्वाच्या आंदोलनात लढणाऱ्यांना 250 चौरस फुटांचे घरही दिलं जाईल, असे ते म्हणाले. दुसऱ्या हमीत महिलांना दरमहा 2500 रुपये, सिलेंडर 500 रुपयांना देण्यात येणार तसंच बसमध्ये मोफत प्रवास देण्यात येणार आहे. तिसरी हमी गृह ज्योती आहे. त्याअंतर्गत 200 युनिट मोफत वीज दिली जाईल. चौथ्या योजनेंतर्गत कॉलेजमधील शिक्षणासाठी 5 लाख रुपयांपर्यंतची मदत आणि कोचिंगसाठी आर्थिक मदत दिली जाईल. वृद्धांसाठी 4,000 रुपये मासिक पेन्शन आणि 10 लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला जाईल आणि शेवटी शेतकर्‍यांसाठी 15,000 रुपये आणि शेतमजुरांसाठी 12,000 रुपये वार्षिक दिले जातील, असं त्यांनी सांगितलंय.

हेही वाचा :

  1. Jyotiraditya Scindia On Rahul Gandhi : ज्योतिरादित्य सिंधियांचा राहुल गांधींवर हल्लाबोल; म्हणाले, संकुचित मानसिकतेमुळं...
  2. Rahul Gandhi Europe Visit : जी-20 शिखर परिषदेपूर्वी राहुल गांधी युरोप दौऱ्यावर,
  3. Amit Shah On INDIA Alliance : इंडिया आघाडीकडून 'सनातन धर्माचा' अपमान -अमित शाह

ABOUT THE AUTHOR

...view details