पणजी -गोवा विधानसभा निवडणुकीच्या ( Goa Assembly Election ) प्रचाराची धुमश्चक्री आता जोरदार सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi In Goa ) यांनी मुरगावमध्ये पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ घरोघरी जाऊन प्रचार केला. यानंतर ते इंटरनॅशनल सेंटर, डोना पॉला येथे उमेदवारांसोबत बैठक घेणार असल्याची माहिती आहे.
राहुल गांधी यापूर्वी 2 फेब्रुवारीला गोवा दौऱ्यावर येणार होते. पण, संसदीय कार्यामुळे त्यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला होता. आज सकाळी राहुल गांधी पणजीत दाखल झाले. राहुल गांधी आज आपल्या दौऱ्यात घरोघरी प्रचारासह पर्यटन क्षेत्रातील प्रतिनिधी, अंगणवाडी कर्मचारी आणि इतरांशी ते संवाद साधणार आहेत. याशिवाय ते कार्यकर्त्यांच्या सभांना संबोधित करणार असून काँग्रेसच्या उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहेत.