जयपूर (राजस्थान) -आम्हाला हिंदुंचे राज्य आणायचे आहे हिंदुत्त्ववाद्यांचे नाही, असे प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. ते जयपूर येथे आयोजित कांग्रेसच्या 'महंगाई हटाओ' रॅली संबोधित करत होते. (Rahul Gandhi in Mehagai Hatao Rally) यावेळी त्यांनी वाढत्या महागाईमुळे केंद्र सरकारला जबाबदार ठरवले. ते म्हणाले, महागाई आणि कोरोनाच्या संकटामुळे देशाची जी परिस्थिती आहे ती नागरिकांच्या समोर आहे.
भारत हा देश हिंदुंचा आहे. हिंदुत्त्ववाद्यांचा नाही. आज देशासमोर विचारधारेची ही नवीन लढाई आहे. आपल्याला हिंदू आणि हिंदुत्त्ववाद्यांमध्ये अंतर काय आहे, हे समजून घ्यावे लागेल. मी हिंदु आहे. मात्र, हिंदुत्त्ववादी नाही. कारण, हिंदुला सत्य पाहिजे. तो सत्यासोबत उभा राहतो. तर हिंदुत्तवाद्याला सत्ता पाहिजे. तो सत्तेसाठी कोणत्याही स्तरापर्यंत जाऊ शकतो.