महाराष्ट्र

maharashtra

Rahul Gandhi Detained : राहुल गांधींना दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात

By

Published : Jul 26, 2022, 1:59 PM IST

नवी दिल्ली : दिल्लीच्या विजय चौकात कार्यकर्त्यांसह आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांना पोलिसांना ताब्यात घेतले आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीच्या ( ED probe Sonia Gandhi ) विरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या आंदोलना दरम्यान विजय चौकात राहुल गांधींना ताब्यात घेण्यात आले.

Rahul Gandhi
Rahul Gandhi

नवी दिल्ली -नॅशनल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात सक्तवुसली संचलनालयाने ( ED ) काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना चौकशीसाठी ( ED probe Sonia Gandhi ) बोलावले आहे. ईडीच्या कार्यालयात त्यांची चौकशी सुरू आहे. याआधीही एकदा त्यांची चौकशी ईडीने केली आहे. आज सोनिया गांधी यांची ईडी चौकशी सुरू असतानाच काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्लीच्या विजय चौकात जोरदार आंदोलन केले. राहुल गांधी त्यांचे नेतृत्व करीत होते.

सोनिया गांधीमंगळवारी पुन्हा एकदा दिल्लीतील ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी ( ED probe Sonia Gandhi ) दाखल झाल्या. याआधीही चौकशीच्या वेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. आजही सोनिया गांधींच्या चौकशीवेळी रस्त्यावर उतरले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक निदर्शने केली. दिल्लीच्या विजय चौक परिसरातील आंदोलनात राहुल गांधीही सहभागी होते. आंदोलना दरम्यान राहुल गांधींसह कार्यकर्त्यांनी विजय चौकात ठिय्या दिला. त्यामुळे पोलिसांनी राहुल गांधी यांना ताब्यात घेतले आहे. राहुल गांधी यांना ताब्यात घेतल्यानंतर देशभरात काँग्रेसचे कार्यकर्ते आणखी आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा -न्यूड फोटो सेशन भोवले! अभिनेता रणवीर सिंगच्या विरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details