नवी दिल्ली -काँग्रेस नेता राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढ, अर्थव्यवस्था, कृषी आंदोलन आशा मुद्यावरून केंद्राला लक्ष्य करत आहेत. आता पुन्हा राहुल गांधींनी बेरोजगारीवरून केंद्रावर निशाणा साधला. हिम्मत असेल तर नोकरी आणि शेतकऱ्यांवर बोला, असे टि्वट राहुल गांधींनी केले आहे. #KisanKiBaat #JobKiBaat हा हॅशटॅग त्यांनी टि्वट केला.
गेल्या काही दिवसांपासून सोशल माध्यमांवर #ModiRojgarDo हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. युजर्संनी रोजगारासंदर्भात अनेक मीम्स टि्वट केले आहेत. काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे उद्योगपतींशी असलेल्या संबंधावरून 'हम दो हमारे दो' हॅशटॅग टि्वट करत टीका केली होती.
राहुल गांधींची आरएसएसवर टीका -