नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पेगासस हेरगिरी, महागाई आणि कृषी कायदे यासह विविध मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी एकजूट दाखविण्यास सुरुवात केली आहे. विरोधी पक्षनेत्यांबरोबर काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी आज बैठक घेतल्यानंतर कॉन्स्टिट्यूशन क्लब ते संसदेपर्यंत सायकल मार्च काढला आहे.
राहुल गांधींच्या बैठकीत डावे पक्ष, शिवसेना, द्रमुक, राजद, तृणमू काँग्रेससह इतर विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. राष्ट्रवादी पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल व खासदार सुप्रिया सुळे उपस्थि होत्या. यावेळी आम आदमी पक्षाचे नेते गैरहजर होते. सर्व शक्तींची एकजूट करणे, ही माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची बाब आहे. जेवढे लोक एकत्रित, तितका आवाज शक्तीशाली होईल. त्यामुळे भाजप-आरएसएसला दाबून टाकणे कठीण होईल, असे राहुल गांधींनी विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत सांगितले.
हेही वाचा-संजय राऊत यांनी घेतली काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट; नेमकी कशावर चर्चा झाली?