महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Rahul Gandhi : पैलवांनाना पोलिसांकडून धक्काबुक्की राहुल गांधींची मोदी सरकारवर सडकून टीका

दिल्लीच्या जंतर-मंतरवर आंदोलन करणारे पैलवान आणि दिल्ली पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्याच्या घटनेवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली आहे. 'खेळाडूंसोबत केले जाणरे वर्तन हे लाजिरवाणे आहे. 'बेटी बचाओ' ची घोषणा ही फक्त एक ढोंग आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

पैलवांनाना पोलिसांकडून धक्काबुक्की राहुल गांधींची केंद्र सरकारवर सडकून टीका
rahul gandhi

By

Published : May 4, 2023, 6:17 PM IST

नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी ट्विट करत केंद्रावर टीका केली. राहुल गांधी ट्विटमध्ये म्हणाले की, ''देशातील खेळाडूंसोबत होणारे हे वर्तन खूप लाजिरवाणे आहे. 'बेटी बचाओ' ची घोषणा फक्त एक ढोंग आहे. खरंतर भाजपा भारताच्या लेकींवर अत्याचार करण्यासदेखील मागे हटत नाही असही ते म्हणाले आहेत. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा म्हणाल्या की, पैलवानांची सुनावणी झाली पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे. प्रियंका गांधी वाड्रा यांनीही ट्विट करत पैलवानांना पाठिंबा दिला. ट्विट करताना त्या म्हणाल्या की, मोठी मेहनत घेऊन आणि देश आणि आपल्या कुटुंबाचे नाव मोठं करणाऱ्या महिला खेळाडूंच्या डोळ्यात अश्रु पाहून खूप दु:ख होत आहे. त्यांची सुनावणी झाली पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे असही ते म्हणाले आहेत.

पदक जिंकून आणता तेव्हा प्रत्येकजण ट्विट करत असतात : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा याआधीही जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या पैलवानांना भेटल्या होत्या. पैलवानांना भेटल्यानंतर प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकार टीका केली. केंद्र सरकार बृजभूषणला वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप प्रियंका गांधी वाड्रा यांनी केला होता. माध्यमांशी बोलताना काँग्रेस नेते म्हणाले की, ''जेव्हा मुली देशासाठी पदक जिंकून आणतात तर तेव्हा प्रत्येकजण ट्विट करत असतात आणि म्हणतात की हे देशाचे गौरव आहेत. परंतु जेव्हा त्या रस्त्याच्या बाजूला बसून सुनावणी करण्यात यावी, याची मागणी करत आहेत. तर त्यांची तक्रार कोणी ऐकत नाही. जर तक्रार दाखल करण्यात आली आहे, तर त्याची एक प्रत सर्वांना दाखवली पाहिजे''.

पदावर असतील तर ते दबाव टाकतील : प्रियंका गांधी म्हणाल्या की, ''मला पंतप्रधानांकडून काही अपेक्षा नाही. जर त्यांना पैलवानांविषयी चिंता असती तर ते पैलवानांना निदान भेटले असते आणि त्यांच्याशी चर्चा केली असती. जेव्हा हे खेळाडू पदक जिंकत होते, तेव्हा ते त्यांना चहासाठी बोलवत असतं. यामुळे पैलवानांना बोलवा आणि त्यांच्याशी चर्चा करा. कारण या आपल्या मुली आहेत''. प्रियंका गांधी वाड्रा म्हणाल्या की, ''ज्या व्यक्तीविरोधात गंभीर आरोप आहेत, त्यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे आणि पदापासून दूर गेले पाहिजे. ते जर या पदावर असतील तर ते दबाव टाकतील आणि लोकांचे करिअर खराब करतील''

ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध प्राथमिक तक्रार दाखल : काँग्रेस नेते म्हणाले की, ''जर ती व्यक्ती पदावर असेल तर त्या पदाचा वापर करून ती व्यक्ती पैलवानाचे करिअर खराब करू शकेल. त्यांना त्रास देईल आणि त्यांच्यावर दबाव टाकेल. त्यामुळे केलेल्या एफआयरचा आणि तपासाचा काय अर्थ राहील. दरम्यान, महिला पैलवानांनी भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी भारतीय कुस्ती महासंघाचे प्रशिक्षक आणि अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरुद्धात दोन प्राथमिक तक्रार दाखल केल्या आहेत.

आमदार सोमनाथ भारतीसह काहीजणांना ताब्यात घेतले: लैंगिक शोषणाच्या आरोपाप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांना अटक करण्यात यावी याची मागणी महिला पैलवान करत आहेत. या मागणीसाठी त्या जंतर-मंतरवर आंदोलन करत आहेत. यादरम्यान पैलवान आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली होती. यामुळे काही आंदोलकर्त्यांच्या डोक्याला जखम झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आम आदमी पार्टीचे आमदार सोमनाथ भारतीसह काहीजणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही वाचा :Fadnavis: फडणवीस बेळगावात प्रचाराला जाताना महाराष्ट्र एकीकरण समितीने दाखवले काळे झेंडे

ABOUT THE AUTHOR

...view details