नवी दिल्ली- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी 20 मे रोजी लंडनमधील एका ( Rahul Gandhi in UK ) कार्यक्रमात म्हणाले की, भारताची स्थिती चांगली नाही. भाजपने केरोसीन तेल देशभर पसरवले आहे. एका ठिणगीने आम्ही मोठ्या संकटात सापडू. लोकांना, समाजाला, राज्यांना आणि धर्मांना एकत्र आणणे ही विरोधी पक्षाची, अगदी काँग्रेसचीही जबाबदारी आहे, असे मला वाटते. लंडनमध्ये आयोजित 'आयडियाज फॉर इंडिया' ( Ideas for India conference ) या परिषदेत ते म्हणाले
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींना ( Rahul Gandhi UK Visit ) विचारण्यात आले की निवडणुकीत भाजप का जिंकत आहे आणि काँग्रेस का नाही? त्याला उत्तर देताना ते म्हणाले, ध्रुवीकरण आणि प्रसारमाध्यमांचे संपूर्ण वर्चस्व हे कारण आहे. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ( Rahul Gandhi Compare Ladakh situation ) जनमानसात घुसून एक रचना तयार केली आहे. विरोधी पक्ष आणि काँग्रेसने अशी रचना करण्याची गरज आहे. भाजपला मत न देणाऱ्या 60 ते 70 टक्के लोकांपर्यंत आम्हांला अधिक आक्रमकपणे जाण्याची गरज आहे. हे एकत्र आणण्याची गरज आहे.
लडाखमधील स्थिती चिंताजनक-राहुल म्हणाले, 'मला वाटते की एका कंपनीचे सर्व विमानतळ, सर्व बंदरे, सर्व पायाभूत सुविधांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत धोकादायक आहे. खाजगी क्षेत्राची मक्तेदारी या स्वरूपात कधीच अस्तित्वात नव्हती. सत्ता आणि भांडवल यांची सांगड इतक्या मोठ्या प्रमाणावर कधीच अस्तित्वात नव्हती. प्रसारमाध्यमे भांडवलाच्या शक्तीने नियंत्रित केली जातात. रशिया लडाखमध्ये युक्रेनमध्ये जशी परिस्थिती निर्माण करत आहे, तशीच परिस्थिती चीनने निर्माण केली आहे. पण नरेंद्र मोदी सरकार यावर बोलू इच्छित नाही, असा दावा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला.