वारंगल: तेलंगणातील शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही. काँग्रेसचे सरकार बनताच, 2 लाख रुपये शेती कर्ज माफ केले जाईल आणि शेतकऱ्यांच्या पीकाला योग्य भाव मिळेल. हे काँग्रेसचे सरकार स्थापनेच्या अगदी काही महिन्यांत केले जाईल अशी माहिती काँग्रेस नेते राहुल गांधी तेलंगणातील वारंगलमध्ये आयोजित रयतू संघर्ष सभेत बोलत होते.
तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांच्या विधवा रडत आहेत, हजारो विधवा अशा आहेत ज्यांच्या पतींनी आत्महत्या केल्या त्याची जबाबदारी कोणाची? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. तसेच निवडणुकीत काँग्रेसचे तिकीट गुणवत्तेच्या आधारावर दिले जाईल, तुम्ही कितीही ताकदवान आहात, कितीही मोठे आहात. तुम्ही गरीब, शेतकऱ्यांसोबत नसाल तर तुम्हाला काँग्रेसचे तिकीट मिळणार नाही अशी घोषनाही त्यांनी यावेळी केली.