महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा मोदींकडून प्रयत्न - राहुल गांधी - राहुल गांधी लेटेस्ट न्यूज

राहुल गांधी यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. वेळ नष्ट करून, मोदी सरकारला शेतकऱ्यांना फोडायचं आहे, पण तसे होणार नाही, असे टि्वट राहुल गांधींनी केले आहे.

राहुल गांधी
राहुल गांधी

By

Published : Feb 18, 2021, 5:09 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. केंद्राने तीनही कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी त्यांनी केली. सरकारच्या प्रत्येक अन्यायाविरोधात शेतकरी आणि देश तयार आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

'ही एक साधी आणि सरळ बाब आहे. तिन्ही कृषीविरोधी कायदे रद्द करावे. वेळ नष्ट करून, मोदी सरकारला शेतकऱ्यांना फोडायचं आहे, पण तसे होणार नाही, असे टि्वट राहुल गांधींनी केले आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करून यूपी सरकारवर निशाणा साधला होता. केवळ दलित समाजत नाही. तर युपी सरकार महिलांचा सन्मान आणि मानवाधिकार पायदळी तुडवत आहे. मात्र, काँग्रेस पक्ष पीडितांचा आवाज म्हणून कायमसाठी उभा आहे. आम्ही त्यांना न्याय देऊनच दम घेऊ, असे राहुल गांधी म्हणाले .

शेतकऱ्यांचे आंदोलन -

किसान संयुक्त मोर्चाने आज देशभरात दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत रेल्वे रोको आवाहन केले होते. किसान मोर्चाच्या आवाहनानंतर देशात मोठ्या प्रमाणत रेल्वे अडवण्यात आल्या. 26 जानेवारीनंतर ट्रॅक्टर रॅलीदरम्यान हिंसाचार झाल्यानंतर पहिल्यांदाच शेतकरी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. गेल्या 80 दिवसांपासून शेतकऱ्यांचे मोदी सरकारविरोधात आंदोलन सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details