महाराष्ट्र

maharashtra

विज्ञान खोटे बोलत नाही, मोदी खोटे बोलतात; कोरोना मृत्यू संख्येवरून राहुल गांधींचा घणाघात

By

Published : May 6, 2022, 1:44 PM IST

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी दावा केला आहे की, "WHO नुसार, 47 लाख भारतीय नागरिकांचा कोरोना महामारीमुळे मृत्यू झाला आहे, तर सरकारच्या म्हणण्यानुसार 4.8 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. ( Rahul Gandhi's tweet ) यामध्ये विज्ञान खोटे बोलत नाहीत. तर पंतप्रधान मोदी खोटे बोलत आहेत असा घणाघात राहुल यांनी केला आहे.

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी
काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी

नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची केंद्र सरकारसह मोदी यांच्यावर चांगलाच हल्ला चढवला आहे. कोरोनामुळे झालेले मृत्यू मोदी सरकारने लपवले आहेत. मात्र, (WHO)ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार विज्ञान खोटे बोलत नाही. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे बोलत आहेत असा थेट आरोप राहुल यांनी केला आहे. ( Rahul Gandhi Attacked The Government ) "कोरोना साथीच्या आजारामुळे 47 लाख भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. तर, सरकारने 4.8 लाख मृत्यूंचा दावा केला आहे. यावर विज्ञानाचा दाखला देत राहुल यांनी हल्ला चढवला आहे. दरम्यान, ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांचा आदर करा. तसेच, त्या कुटुंबाला आर्थिक मदत द्या अशी मागणीही राहुल यांनी केली आहे.

WHOने गुरुवारी सांगितले की 14.9 दशलक्ष थेट कोरोनामुळे, तसेच, आरोग्य प्रणाली आणि समाजावर महामारीच्या प्रभावामुळे मरण पावले आहेत. ( How Many Corona Deaths Occurred In India ) अहवालानुसार, भारतात 4.7 दशलक्ष कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत, जे सरकारी आकडेवारीच्या 10 पट आहेत. तर, जागतिक स्तरावर कोरोनामुळे मृत्यूं झालेल्यांची ती संख्या एक तृतीयांश आहे अशी माहितीही त्यांनी दिली आहे.


जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)च्या डेटाची उपलब्धता लक्षात घेता, कोरोना व्हायरस साथीच्या आजाराशी संबंधित मृत्यूची माहिती सादर केली आहे त्यावर भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे. डाटासाठी वापरलेली प्रणाली आणि केलेले संकलन संशयास्पद आहे असे म्हणत या अहवालावर भारताने आक्षेप घेतला आहे.

हेही वाचा -राज ठाकरेंना नवी ओळख, आता झाले 'किआन'चे आजोबा

ABOUT THE AUTHOR

...view details