महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'राहुल गांधींना ड्रग्जचं व्यसन, ते तस्करी देखील करतात'; कर्नाटकातील भाजपा नेत्याचे वादग्रस्त विधान

कर्नाटकातील भाजपा प्रदेशाध्यक्ष नलीन कुमार कटील यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी हे ड्रग्जचं सेवन करतात आणि त्याची तस्करीदेखील करतात, असे धक्कादायक विधान केलं आहे. नलीन कुमार कटील यांच्या वक्तव्याने नाव वाद निर्माण झाला असून काँग्रेस आक्रमक झाली आहे.

Rahul Gandhi
राहुल गांधी

By

Published : Oct 20, 2021, 10:25 AM IST

हुबळी - अभिनेता सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर उघड झालेले ड्रग्ज प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्स पार्टी प्रकरणात अटक झाल्यानंतर हा मुद्दा आणखीच गाजला आहे. यातच कर्नाटकातील भाजपा प्रदेशाध्यक्ष नलीन कुमार कटील यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी हे ड्रग्जचं सेवन करतात आणि त्याची तस्करीदेखील करतात, असे धक्कादायक विधान केलं आहे. नलीन कुमार कटील यांच्या वक्तव्याने नाव वाद निर्माण झाला असून काँग्रेस आक्रमक झाली आहे.

राहुल गांधी कोण आहेत? राहुल गांधी हे ड्रग्ज घेतात आणि त्याची तस्करीसुद्धा करतात. हे मी सांगत नाही. तर मीडियामधून ही बातमी आली आहे, असं नलीन कुमार कटील यांनी हुबळीमध्ये एका सभेला संबोधित करताना म्हटलं. तसेच राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी हे एक पक्ष चालवू शकत नाहीत. जी व्यक्ती राजकीय पक्षाचे नेतृत्व करू शकत नाही. ती राष्ट्राचे नेतृत्व करू शकते का? ते राष्ट्रीय पक्ष चालवू शकत नाहीत आणि राष्ट्राचे नेतृत्व करण्याचे स्वप्न पाहत आहेत, असे नलीन कुमार कटील म्हणाले.

नलीन कुमार कटील यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांनी संताप व्यक्त केला. 'राजकारणात राजकीय चर्चा करताना नेहमी नागरी आणि संसदीय भाषेचा वापर व्हायला पाहिजे, यावर माझा विश्वास आहे. आशा आहे की, भाजपा प्रदेशाध्यक्ष हे राहुल गांधींविरोधात केलेल्या अपमानास्पद आणि संसदीय वक्तव्याबद्दल माफी मागतील, असे शिवकुमार म्हणाले. यापूर्वी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अशिक्षित असा उल्लेख केल्यामुळे अगोदरच वाद निर्माण झाला होता. त्यातच, आता भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या विधानामुळे आणखी वाद वाढताना दिसत आहे.

हेही वाचा -महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खळबळ..! सचिन सावंत यांचा काँग्रेस प्रवक्तेपदाचा राजीनामा; लोंढेंच्या बढतीमुळे सावंत नाराज?

ABOUT THE AUTHOR

...view details