नवी दिल्ली: राहुल भट यांना ( Rahul Bhat killing ) न्याय मिळावा आणि काश्मीर खोर्यातील अल्पसंख्याक समुदायाला सुरक्षा पुरवण्याची मागणी करत काश्मिरी पंडितांनी शुक्रवारी आंदोलन सुरूच ( Kashmiri Pandits protest ) ठेवले. मागण्या पूर्ण न झाल्यास सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. बडगामच्या शेखपोरा येथील पंडित कॉलनीत, या हत्येचा निषेध नोंदवण्यासाठी काश्मिरी पंडितांच्या आंदोलकांनी श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे मोर्चा वळवला.
"आम्ही सकाळी 11 वाजेपर्यंत लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची वाट पाहत होतो पण ते आले नाहीत. आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता आणि आम्ही राहुल भटच्या हत्येविरोधात विमानतळाकडे मोर्चा वळवण्याचा निर्णय घेतला," असे मोर्चा दरम्यान एका आंदोलकाने सांगितले. "आम्ही प्रशासन आणि पोलिसांना कळवले होते की उपराज्यपाल यांनी घटनास्थळी भेट द्यावी आणि आम्हाला आमच्या सुरक्षिततेबद्दल आणि न्यायाचे आश्वासन द्यावे, परंतु त्यांनी आम्हाला भेट दिली नाही."
पोलिसांनी मात्र अल्पसंख्याक समाजाचा निषेध मोर्चा हाणून पाडला :एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "आंदोलकांमधील काही लोकांनी दगडफेक केल्याने आम्हाला अश्रुधुराच्या गोळ्या आणि सौम्य लाठीचार्ज करावा लागला," असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. ते पुढे म्हणाले, "परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. बडगामहून येणारी आणि जाणारी वाहतूक नारकारामार्गे वळवण्यात आली आहे. विमानतळ रस्ता हा श्रीनगरला जाणारा महत्त्वाचा दुवा आहे आणि त्यामुळे आम्हाला अतिरिक्त सावधगिरी बाळगावी लागेल."