महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मोदीविरोधी पोस्टर वादावर राहुल गांधी म्हणाले.. 'मलाही अटक करा' - लस तुटवड्यावर राहुल गांधींचे टि्वट

लसीकरण तुटवड्यावरून देशातील वातावरण तापलं आहे. लसीकरणावरून मोदींवर टीका करणारे पोस्टर दिल्लीत लावण्यात आली. यावरून पोलिसांनी कारवाई करत १५ जणांना अटक केलीय. याचा निषेध नोंदवत राहुल गांधींनी संबंधित पोस्टर शेअर करत मला अटक करा, असं म्हटलं आहे. अनेक काँग्रेस नेत्यांनी संबंधित पोस्टर शेअर केले आहे.

राहुल गांधी
राहुल गांधी

By

Published : May 16, 2021, 5:40 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अलोचना करणारे पोस्टरवरून दिल्लीमध्ये काही जणांना अटक करण्यात आली आहे. यावरून नवा वाद पेटला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनीही ते पोस्टर शेअर केले आहे. पोस्टरचे छायाचित्र शेअर करताना राहुल गांधींनी 'मलाही अटक करा', असे म्हटले आहे. तर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी ट्विटरवर आपला प्रोफाइल फोटो बदलून सबंधित पोस्टर लावले आहे.

राहुल गांधींचे टि्वट

पंतप्रधान मोदींवर टीका करणारे पोस्टर्स चिकटल्याप्रकरणी 25 जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केली. पोस्टर्स दिल्लीच्या अनेक भागात लावण्यात आली होती. आमच्या मुलांच्या हक्काची लस परदेशांना का पाठविली मोदीजी?, असे त्या पोस्टरवर लिहलेले आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल कलम १88 अन्वये एफआयआर नोंदविण्यात आली आहे.

प्रियंका गांधींचे टि्वट

पोस्टर्स लावणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई -

दिल्लीतील शाहदरा, रोहिणी, रीठला, द्वारका आणि इतर अनेक ठिकाणी संबंधित पोस्टर्स लावण्यात आली होती. 12 मे रोजी पोलिसांना दिल्लीतील विविध भागात ही पोस्टर्स लागली असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्वरित कारवाई करत 13 मे पर्यंत सर्व पोस्टर्स हटवली. तसेच पोस्टर्स लावणाऱ्या अटक केली. यात 19 वर्षीय मुलगा, 30 वर्षीय ऑटो चालक आणि 61 वर्षीय मजुराचा समावेश आहे.दरम्यान कुणाच्या सांगण्यावरून हे पोस्टर्स लावण्यात आले होते, हे अद्याप समोर आलेले नाही.

परदेशात लस पाठवल्याने देशात लसीचा तुटवडा -

सुरुवातीला तयार होणारी लस दुसऱ्या देशात पाठवल्यामुळे देशात लसींची कमतरता जाणवत असल्याची टीका केंद्रावर विरोधीपक्षांकडून केली जात आहे. देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु असताना आणि काही भागात लसींचा तुटवडा भासत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. अनेक राज्यात लसीकरण थंबवण्यात आलं आहे, तर काही ठिकाणी लसीकरण मंदावली आहे. अनेक राज्ये ग्लोबल टेंडर काढण्याच्या तयारीत आहेत.

हेही वाचा -चटका लावणारी एक्झिट! वाचा खासदार राजीव सातव यांच्या निधनावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details