हल्द्वानी (उत्तराखंड) : हल्द्वानी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Haldwani Government Medical College) रॅगिंगच्या घटनेनंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. (Ragging in Haldwani Government Medical College). गेल्या वर्षी ज्युनिअर विद्यार्थ्यी मुंडण करून फिरत असल्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्याचवेळी, आता पुन्हा एका ज्युनियर विद्यार्थ्यासोबत मोबाईलवर रॅगिंग झाल्याची चर्चा चव्हाट्यावर आली आहे. या संपूर्ण प्रकरणात कॉलेज प्रशासनाने एका विद्यार्थ्याला 50,000 रुपयांचा दंड ठोठावला असून त्याला वसतिगृहातून बाहेर काढले आहे. यासोबतच या संपूर्ण प्रकरणात अन्य 43 विद्यार्थ्यांवर 25-25 हजार रुपयांच्या दंडाची कारवाई करण्यात आली आहे. (Action against 44 students in ragging case).
द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी केले रॅगिंग : MBBS द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांवर व्हिडिओ कॉलद्वारे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण 9 डिसेंबरच्या रात्रीचे आहे. 2021 च्या बॅचच्या एका वरिष्ठाने ज्युनियरला कॉल केला आणि त्याला इतर विद्यार्थ्यांसह त्याच्या खोलीत बोलावून व्हाईट कोट समारंभाची माहिती देण्यास सांगितले. वरिष्ठ विद्यार्थ्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे रॅगिंग करून कनिष्ठ विद्यार्थ्यांना शिवीगाळ केली. त्यासोबतच त्यांना कोंबडेही बनवण्यात आले. झालेल्या घटनेची तक्रार एका कनिष्ठ विद्यार्थ्याने महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अरुण जोशी यांच्याकडे केली.