महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Amritpal Singh Filmy Style Arrest : 100 पोलिसांच्या गाड्या, 2 तास पाठलाग; फिल्मी स्टाईलने अमृतपाल सिंग सापडला कचाट्यात - Amritpal Singh Filmy Style Arrest

खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग आणि त्याच्या साथीदारांना पंजाब पोलिसांनी शनिवारी अटक केली. अजनाळा पोलिस ठाण्यावरील हल्ल्याशी संबंधित गुन्ह्यात ही अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलिसांनी संयुक्त कारवाई करून या आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. फिल्मी स्टाईलने पाठलाग करुन पोलिसांनी अमृतपालला अटक केली.

Amritpal Singh
Amritpal Singh

By

Published : Mar 18, 2023, 5:45 PM IST

Updated : Mar 18, 2023, 5:50 PM IST

याच गाडीत होता अमृतपाल सिंग

चंदीगड(पंजाब) : अमृतपालच्या 6 साथीदारांना शनिवारी दुपारी अमृतपालसोबत जालंधरहून मोगाच्या दिशेने जात असताना अटक करण्यात आली. पंजाब पोलिसांनी गराडा घालताच अमृतपाल स्वतः कारमध्ये बसून लिंक रोडने पळून गेला. सुमारे 100 पोलिसांच्या वाहनांनी सुमारे दीड तास पाठलाग करून जालंधरच्या नकोदर परिसरातून त्याला पकडले. याशिवाय अमृतपालच्या दोन साथीदारांना अमृतसरमधील वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात आली आहे. यामध्ये बलसारण जोधा गावातील हरमेल सिंग जोध आणि शेरो गावातील हरचरण सिंग यांचा समावेश आहे. नववा व्यक्ती मोगा येथील भगवंत सिंग उर्फ ​​बाजेके असून त्याला त्याच्या शेतातून अटक करण्यात आली आहे.

२४ तास मोबाइल इंटरनेट सेवा बंद : परिस्थिती आणखी बिघडण्याच्या भीतीने पंजाबमध्ये २४ तास मोबाइल इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. राज्यात शनिवारी दुपारी १२ ते रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत मोबाईल इंटरनेट आणि बल्क एसएमएस सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

कारमधून पळून जातांनाचा व्हिडिओ :पंजाब पोलिसांनी नाकाबंदी केल्यानंतर अमृतपाल सिंग कारमधून पळून जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. 'वारीस पंजाब दे' या खलिस्तान समर्थक संघटनेचा प्रमुख अमृतपालवर 3 गुन्हे दाखल आहेत, त्यापैकी दोन प्रकरणे अमृतसर जिल्ह्यातील अजनाला पोलिस ठाण्यात आहेत. आपल्या एका जवळच्या मित्राच्या अटकेमुळे संतप्त झालेल्या अमृतपालने त्याच्या समर्थकांसह 23 फेब्रुवारी रोजी अजनाळा पोलिस स्टेशनवर हल्ला केला होता. याप्रकरणी कोणतीही कारवाई न केल्याने पंजाब पोलिसांवर बरीच टीका होत आहे.

जालंधर-मोगा पोलिसांची संयुक्त कारवाई :शनिवारी अमृतपालने जालंधर-मोगा राष्ट्रीय महामार्गावर शाहकोट-मलसियान भागात, भटिंडा जिल्ह्यातील रामपुरा फूलवर कार्यक्रम आयोजित केले होते. शाहकोट-माल्सियान परिसरात त्यांच्या कार्यक्रमासाठी सकाळपासूनच समर्थकांची गर्दी होऊ लागली होती. या कार्यक्रमापूर्वीच जालंधर मोगा पोलिसांनी संयुक्त कारवाईत गुप्तपणे अमृतपालला अटक करण्याची रणनीती आखली होती. त्यासाठी जवळपासच्या अनेक जिल्ह्यांतून रात्रभर पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला होता. जालंधर-मोगा राष्ट्रीय महामार्गावरही सकाळपासून नाकाबंदी करण्यात आली होती.

'या' होता वाहनात अमृतपाल स्वार : अमृतपालचा ताफा शनिवारी दुपारी एकच्या सुमारास जालंधरच्या मेहतपूर शहराजवळ पोहोचताच पोलिसांनी नाकाबंदी केली. ताफ्यात सर्वात पुढे असलेल्या 2 वाहनांमधून प्रवास करणाऱ्या 6 जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले. अमृतपालची मर्सिडीज कार काफिल्यात तिसऱ्या क्रमांकावर होती. पोलिसांना पाहताच त्याच्या चालकाने गाडी लिंक रोडच्या दिशेने वळवून पळ काढला. जालिंदर आणि मोगा पोलिसांनी त्याचा पाठलाग केला.

साथीदारांकडून पोलिसांनी शस्त्रे जप्त :अटक करण्यात आलेल्या अमृतपालच्या सहा साथीदारांकडून पोलिसांनी अनेक शस्त्रे जप्त केली आहेत. जालंधरच्या मैहतपूर पोलिसांनी त्याला अटक केली. अमृतपाल कारमध्ये बसून पळून जात असल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये अमृतपाल गाडीच्या पुढच्या सीटवर बसलेले दिसत आहेत. आपल्या समर्थकांना एकत्र येण्याचे आवाहन करत आहेत. कारमध्ये उपस्थित अमृतपालचे समर्थक पोलीस त्याच्या मागावर असल्याचे सांगतांना दिसत आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे दीड तास पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी अमृतपालला नकोदर परिसरातून अटक केली.

अमृतसर येथून दोन साथीदारांना अटक :अमृतपालच्या दोन साथीदारांना अमृतसरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात आली. यामध्ये अमृतसरमधील बलसारण जोधा गावातील रहिवासी हरमेल सिंग जोध आणि शेरोन गावातील हरचरण सिंग यांचा समावेश आहे.

पोलिसांना बाजेके सोशल मीडियावर लाइव्ह :अमृतपालचा जवळचा साथीदार भगवंत सिंग उर्फ ​​बाजेके याला पोलिसांनी मोगा येथून पकडले. भगवंत शेतात गुरांसाठी चारा कापत असताना त्याला अटक करण्यात आली. भगवंत सिंग यांनी सोशल मीडियावर लाइव्ह करत पोलीस 5 वाहनांतून त्याच्या दिशेने येत असल्याचे शुट केले. सोशल मीडियावर शस्त्रांसह फोटो पोस्ट केल्याप्रकरणी भगवंत सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो पंजाब सरकारच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट करत आहे.

पंजाबमध्ये तणावाचे वातावरण :अमृतपालला अटक झाल्याची बातमी येताच पंजाबमध्ये तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, 23 फेब्रुवारी 2023 रोजी खलिस्तान समर्थक संघटनेचे प्रमुख अमृतपाल यांच्या नेतृत्वाखाली त्याच्या हजारो समर्थकांनी अमृतसरमधील अजनाला पोलिस स्टेशनवर हल्ला केला होता. त्यांच्या हातात तलवारी, बंदुका होत्या. हे लोक अमृतपालच्या निकटवर्तीय लवप्रीत सिंग तुफानच्या अटकेविरोधात आंदोलन करत होते. या हल्ल्याच्या दबावाखाली पंजाब पोलिसांना लवप्रीत सिंग तुफानच्या सुटकेची घोषणा करावी लागली होती.

पंजाबमध्ये इंटरनेट, एसएमएस सेवा बंद :अमृतपालच्या अटकेनंतर पंजाबमध्ये मोबाईल इंटरनेट आणि मोठ्या प्रमाणात एसएमएस सेवा बंद करण्यात आली आहे, यासंबंधीचे आदेश पंजाबच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी जारी केले आहेत. या आदेशात असे म्हटले आहे की पंजाबच्या डीजीपीकडून माहिती देण्यात आली आहे की, सोशल मीडिया आणि बल्क एसएमएसद्वारे पंजाबमध्ये लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. यानंतर राज्यातील मोबाईल इंटरनेट आणि बल्क एसएमएस सेवा शनिवारी दुपारी 12 ते रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बँकिंग आणि मोबाईल रिचार्ज वगळता इतर सर्व एसएमएस सेवा बंद राहतील.

अमृतपालच्या गावाला वेढा, केंद्रीय फौज तैनात : अमृतपाल सिंगच्या अटकेनंतर पंजाब पोलिसांनी अमृतसर जिल्ह्यातील रैयाजवळील जल्लूपूर खेडा या गावालाही वेढा घातला आहे. गावात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी करून वाहनांची झडती घेतली जात आहे. पंजाब पोलिसांव्यतिरिक्त केंद्रीय दलाचे जवानही जल्लूपूर खेडाभोवती तैनात करण्यात आले आहेत.

अमृतपाल सिंगच्या अटकेनंतर मोहालीत निदर्शने :मोहाली सीमेवर सुरू असलेल्या इन्साफ मोर्चाने आता अमृतपाल सिंगच्या अटकेचा निषेध सुरू केला आहे. अमरीपाल सिंग यांच्या सुटकेच्या मागणीसाठी ते चंदीगडकडे कूच करत आहेत. पोलिसांचा फौजफाटा सोबत असला तरी आताच परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते.

हेही वाचा - Bageshwar Baba in Mumbai बागेश्वर बाबा यांच्या विरोधात मुंबईत तक्रार, अंनिसचे श्याम मानव म्हणाले, पोलिसांनी कारवाई न केल्यास..

Last Updated : Mar 18, 2023, 5:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details