महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

रचकोंडा पोलिसांच्या हाती मोठे घबाड; ओडिशातून तेलंगाणामार्गे महाराष्ट्रात जाणारा 590 किलो गांजा पकडला - telangana police seized ganja

गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीला रचकोंडा पोलिसांनी Rachakonda Police Seized 590 kg Ganja पकडले आहे. त्यांच्याकडून 590 किलो गांजा जप्त करण्यात Rachakonda Police Seized Ganja आला. रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई Mahesh Bhagwat seized Ganja करण्यात आली आहे.

rachakonda police
रचकोंडा पोलिसांच्या हाती मोठे घबाड

By

Published : Aug 22, 2022, 3:30 PM IST

Updated : Aug 22, 2022, 8:48 PM IST

हैदराबादगांजाची तस्करी करणाऱ्या टोळीला रचकोंडा पोलिसांनी Rachakonda Police Seized 590 kg Ganja पकडले आहे. त्यांच्याकडून 590 किलो गांजा जप्त करण्यात Rachakonda Police Seized Ganja आला. रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई Mahesh Bhagwat seized Ganja करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील परशुराम हा त्याच्या टोळीतील सदस्यांसह ओडिशा येथून गांजा महाराष्ट्रात आणत होता. दोन वाहनांमधून एकूण 590 किलो गांजा 104 पॅकेटमधून महाराष्ट्रात घेऊन जात होता. या गांजाची एकूण किंमत 1 कोटी 30 लाख रुपये इतकी असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे. या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य तीन फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

माहिती देताना रचकोंडा पोलीस आयुक्त महेश भागवत

आरोपी बीड जिल्ह्यातील रहिवासी -संतोष गायकवाड, अजय महादेव इथापे, आकाश शिवाजी चौधरी, विनोद गाडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व आारोपी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आहेत.

करोडो रुपयांचा मुद्देमाल जप्त -गांजाची मोठ्या प्रमाणावर वाहतूक करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एलबी नगर एसओटी पोलीस आणि अब्दुल्लापूर मेट पोलिसांनी नियोजन करून छापा टाकून आरोपींना अटक केली आहे. याआधी देखील करोडो रुपयांचा गांजा पोलीस आयुक्त महेश भागवत यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस पथकाने तेलंगाणात पकडला होता. आज अशाच प्रकारची कारवाई रचकोंडा पोलिसांनी केली आहे.

रचकोंडा पोलिसांची कारवाई

आरोपींकडून गांजासह दोन कार, 8 मोबाईल फोन आणि 1900 रुपये रोख जप्त करण्यात आली आहे. तसेच मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या साईकुमारलाही पोलिसांनी सूर्यपेठ येथून अटक केली आहे. मुख्य आरोपी परशुराम याला यापूर्वी विशाखापट्टणममध्ये गांजाची वाहतूक करताना अटक करण्यात आली होती, असे पोलिसांनी सांगितले. त्याच्यावर वनस्थलीपुरम पीएसमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य तीन फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अटक केलेले आरोपी

हेही वाचाworksite school वीटभट्टी मजुरांच्या चिमुकल्यांसाठी महेश भागवतांनी सुरू केली वस्तीशाळा आता सरकारी शाळेत झाले पुनर्वसन

Last Updated : Aug 22, 2022, 8:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details