महाराष्ट्र

maharashtra

Ganja Seized : तेलंगाणामार्गे मुंबईला जाणारा गांजा रचकोंडा पोलिसांनी पकडला; एकास अटक

By

Published : Mar 14, 2022, 10:16 PM IST

आंध्रप्रदेशमधून तेलंगाणामार्गे मुंबईला गांजाची अवैध वाहतूक (Illegal transporting of Ganja) करणाऱ्या एका गांजा तस्कराला तेलंगाणाच्या रचकोंडा पोलिसांनी (Rachakonda Police) अटक केली आहे. याबाबतची माहिती रचकोंडा विभागाचे पोलीस आयुक्त महेश भागवत (CP Mahesh Bhagwat) यांनी दिली आहे.

Rachakonda Police
रचकोंडा पोलीस

तेलंगाणा - आंध्रप्रदेशमधून तेलंगाणामार्गे मुंबईला गांजाची अवैध वाहतूक (Illegal transporting of Ganja) करणाऱ्या एका गांजा तस्कराला तेलंगाणाच्या रचकोंडा पोलिसांनी (Rachakonda Police) अटक केली आहे. बुधावथ रवी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या आरोपीकडून 102 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला (102 KG Ganja Seized) असल्याची माहिती रचकोंडा विभागाचे पोलीस आयुक्त महेश भागवत (CP Mahesh Bhagwat) यांनी दिली आहे.

  • रचकोंडा पोलिसांची कारवाई -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंध्रप्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील चिंतूर येथून तेलंगाणाच्या झहीराबाद मार्गे हा गांजा मुंबईला जात होता. यासंदर्भातली माहिती मलकाजगिरीच्या एसओटी टीमला मिळाली. त्यानुसार त्यांनी कारवाई करत एका गांजा तस्कराला अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून 102 किलो गांजा आणि एक ऑटो जप्त केली आहे, याची किंमत सुमारे 20 लाख 50 हजार रुपये आहे. तसेच अटक केलेल्या आरोपीवर याआधीही दोन वेगवेगळे प्रकारचे गुन्हा दाखल होते.

दरम्यान, मागील काही महिन्यात आंध्रप्रदेश, तेलंगाणा या भागातून महाराष्ट्रात गांजाची तस्करी होत असल्याचे अनेक प्रकरणे समोर आली होती. अशा अऩेक गांजा तस्करांना रचकोंडा पोलिसांनी वेळीच अटक केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details